Latest Newsआपला जिल्हाकंधारनांदेड

बोरी बु. येथे माजी कॅप्टन जनार्धन सांगवे यांच्या सन्मानार्थ सेवापूर्ती सोहळा..

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव…

 

 भारतीय सैन्यात सतरा वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले कॅप्टन जनार्धन गंगाधर सांगवे उद्या दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या मूळ गावी बोरी बु. (ता. कंधार, जि. नांदेड) येथे आगमन करीत आहेत. त्यांच्या या यशस्वी सेवेला गौरविण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत रॅली आणि सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Img 20251101 Wa0017
Img 20251101 Wa0017
कॅप्टन सांगवे यांनी सैन्यात झारखंड, सागर, जम्मू-काश्मीर, मणिपूर, पुणे अशा विविध संवेदनशील भागात जबाबदारीने व एकनिष्ठतेने सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशसेवा, शिस्त आणि धैर्य यांचे उत्तम उदाहरण घालून दिले. ते बोरी बु. येथील रहिवासी असून त्यांचे वडील या गावात पोलीस पाटील म्हणून शासनाची जबाबदारी पार पाडत आहेत.
त्यांच्या सन्मानार्थ कंधार येथून बोरी बु .पर्यंत स्वागत रॅली काढण्यात येणार असून, या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, युवा मंडळे, सामाजिक संस्था व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.  बोरी बु. येथील ग्रामस्थांनी सर्व नागरिकांना रॅलीत सहभागी होऊन या वीर जवानाचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने बोरी बु. गावात देशभक्तीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button