Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

कुशीनारा नियोजित बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात; बुद्ध विहाराच्या स्वप्नपूर्तीला भिंत बांधकामाचा शुभारंभ

नायगाव प्रतिनिधी..

नायगाव शहरातील कुशीनारा नियोजित बुद्ध विहार परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. बौद्ध धर्माचे पवित्र प्रतीक असलेल्या पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ. अर्चना संजय चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण, माजी सभापती सय्यद रहीम, गटनेते सुधाकर पा. शिंदे, नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, माजी नगराध्यक्ष मीनाताई कल्याण, नगरसेविका सुमनताई सोनकांबळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
Screenshot 20260430 145200 Whatsappbusiness
Screenshot 20260430 145200 Whatsappbusiness
ध्वजारोहणानंतर बुद्ध वंदनेने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.
गेल्या दहा वर्षांपासून कुशीनारा येथे भव्य बुद्ध विहार उभारण्याची मागणी ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते रघुनाथ सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने लावून धरली गेली होती. दिवंगत खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी या मागणीची दखल घेत बुद्ध विहार उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या निधनानंतर खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी ही समाजभावनेशी निगडित मागणी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करत नगरपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या नियोजनातून बुद्ध विहाराच्या उभारणीस प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला.
Screenshot 20260430 145057 Whatsappbusiness
Screenshot 20260430 145057 Whatsappbusiness
त्या अनुषंगाने २९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुद्ध विहाराच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. नगराध्यक्षा अर्चनाताई चव्हाण, मीनाताई कल्याण, श्रीनिवास पाटील चव्हाण, सय्यद रहीम, सुधाकर शिंदे यांच्यासह बौद्ध समाजातील असंख्य बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Img 20260429 Wa0006
Img 20260429 Wa0006
या ऐतिहासिक क्षणी बुद्ध विहाराच्या स्वप्नासाठी संघर्ष करणारे रघुनाथ सोनकांबळे, प्रकाश हनुमंते, दामोदर सोनकांबळे, अमृता भद्रे, पिराजी सोनकांबळे, मधुकर गंगावणे, शोभाताई भद्रे, यशोदा पवार, राजेंद्र सोनकांबळे, यशवंत सोनकांबळे, हाऊगीर सोनकांबळे, गणपत बेंद्रीकर, सूर्यकांत पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
Img 20260429 Wa0011
Img 20260429 Wa0011
कुशीनारा सार्वजनिक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष राजू भद्रे यांच्या सह विविध भीम जयंती मंडळांनी सिद्धार्थ नगर, शाहूनगर आदी भागांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, देखावे आणि संदेशवाहक रथांसह शहरातील प्रमुख मार्गांवर भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीने नायगावकरांच्या मनावर आंबेडकरी विचारांचा ठसा उमटवला.
Img 20260429 Wa0016
Img 20260429 Wa0016
रात्री मिरवणुकीचे विसर्जन झाल्यानंतर कुशीनारा येथे अन्नदानाचा भव्य कार्यक्रम पार पडला.
धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकजूट आणि विकासाभिमुख राजकीय बांधिलकी यांचा संगम घडवणारा हा सोहळा नायगावच्या सामाजिक इतिहासात प्रेरणादायी ठरला असून बुद्ध विहाराच्या उभारणीमुळे बौद्ध समाजाच्या अस्मितेला नवे अधिष्ठान प्राप्त होणार असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button