घुंगराळा येथील ग्रामविकास अधिकारी शिक्षण समिती अध्यक्ष व सरपंच प्रभारी यांच्यावर होणार कारवाई … मीनल करणवाल सीईओ.

कुंटूर प्रतिनिधी…दि.(१७)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे घुंगराळा येथील 9 डिसेंबर 2024 रोजी खंडोबा यात्रेनिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सायंकाळी बॉम्बे डान्स चा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सदर विद्येच्या मंदिरात असे असील कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे समस्त पालक वर्ग व स्वप्निल भोशिकर जिल्हाध्यक्ष नांदेड भीम आर्मी. सुजन नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती
. सदर तक्रारीची माहिती घेत व संपूर्ण प्रकरणाचे चौकशी करून सदर मुख्याध्यापक ग्रामविकास अधिकारी प्रभारी सरपंच व शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी अशी माहिती पत्रकारांना दिली आहे
. घुंगराळा तालुका नायगाव येथे 9.12.2024 रोजी जिल्हा परिषद शाळा येथे ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी मिळून बॉम्बे डान्स चे आयोजन केले होते . जिल्हा परिषदचे विद्येचे माहेरघर म्हटले जाते परंतु या शाळेत असे कार्यक्रम का घेतली जावे हे शिक्षण विभागाला काळीमा फासणारी घटना आहे.शाळेतील विद्यार्थी व पालकांनी याचा काय बोध घ्यावा असे समस्त तालुक्यात एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सदर प्रकरण गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ग्रामविकास अधिकारी हनुमंत शिंदे ,सरपंच प्रभारी वसंत सुगावे ,व शाळेचे मुख्याध्यापक अनकाडे आर .ए, व पदाधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोरं अमरन उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी तक्रार, निवेदन सतीश नारायण वाघमारे वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष ,नायगाव यांनी व विलास निवृत्ती वाघमारे वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व वरिष्ठ शिक्षण मंत्री, शिक्षण, अधिकारी ,नांदेड जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकारी यांचेकडे तक्रार दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईक होणार असल्याची संकेत दिल्यानंतर सदर दोषीवर कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



