Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली

चिटमोगरा येथे अज्ञात व्यक्तीने हरबऱ्याच्या ढगाला लावली आग

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव..

बिलोली तालुक्यातील चीटमोगरा येथील माजी सरपंच त्र्यंबक मलबा देवाले यांच्या दोन एकर शेतामध्ये हरभरा पीक घेण्यात आले होते. ते सर्व हरभरा कापून ढीग रचण्यात आला होता. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने पेटून दिल्याची घटना घडली संपूर्ण हरभरा जळून राग झाला आहे.
दिवसभर उन्हामध्ये पती-पत्नी दोघेही काम करून संध्याकाळी घरी गेल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन हरभरा जमा केलेल्या ढगाला पेटवून दिल्याची घटना घडली . शेजारील व्यक्ती अहमद साहेब शेख यांनी ढगाला आग लागल्याने आरडा ओरडा करताच परिसरातील शेतकरी जमा झाले व त्या ठिकाणी कुठली पाण्याची व्यवस्था नसल्याने संपूर्ण हरभरा जळाला यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सूडबुतीने केलेल्या घटनेबद्दल अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button