महिला शेतकऱ्यांनी दीड एकर शेती मध्ये तब्बल पाच लाख सहा हजार रुपयाचे घेतले टरबुजाचे उत्पन्न.. शेळगाव येथील टरबूजाला केरळ बाजारपेठात मागणी…..
कुटुंर प्रतिनिधी..
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मोजे शेळगाव छत्री येथील युवा शेतकरी उद्योजक महिला सागरबाई दिलीप सालेगाये व त्यांचे पती दिलीप सालेगाये या जोडप्यांनी उच्च शिक्षण घेऊन बारावी व बीए दोघांचेही शिक्षण असून दोघांनी शेतीमध्ये वेगळा प्रयोग करून दीड एकर मध्ये 52 टन टरबुजाचे उत्पन्न घेतल्याने त्यांना पाच लाख सहा हजार रुपयांच्या वर उत्पन्न झाले अशी माहिती सागरबाई दिलीप सालेगाये राहणार शेळगाव छत्री यांनी दिली आहे.
Img 20250309 Wa0039
त्यामुळे सदर नवतरुण शेतकरी जोडप्याचे परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे . 52 टनांपर्यंत टरबुजाचे उत्पन्न झाले. सदर व्यापारी महबूब शेख यांनी सदर टरबुजाचे एक समान वान , पाच किलोच्या वर असणारे टरबूज पाच किलो पर्यंत त्याचे वजन होते . टरबुजाची वाण चांगल्या पद्धतीचे आल्याने पाच ट्रक भरून ते केरळच्या बाजारपेठ मध्ये नेले असल्याची माहिती या व्यापाऱ्यांनी दिली.
. त्यामुळे नवीन नवतरुण महिला उद्योजक शेतकरी यांनी आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने टरबुजाचे भरघोस उत्पन्न घेतल्याने शेतकऱ्याचे परिसरात कौतुक होत आहे. तरी यांच्या टरबूजाला महाराष्ट्राच्या बाहेर केरळ राज्यामध्ये मागणी आल्याने एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कष्टाने व मेहनतीने शेतीमध्येही उत्पन्न चांगल्या पद्धतीने उत्कृष्टरित्या घेता येते.कितिही वाईट परिस्थितीवर मात करून चांगल्या प्रकारे शेतीमध्ये उत्पन्न घेता येते. असे शेळगाव छत्री येथील तरुण जोडपे सागरबाई दिलीप सालेगाये व दिलीप सालेगाव यांनी दाखवून दिले आहे.
सागरबाई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून दिलीपराव यांची शिक्षण बीए झाले आहे. त्यांनी एका कृषी अधिकाऱ्यांकडुन माहिती घेऊन आपल्या शेतामध्ये व्यंकट या टरबूज बियाण्याची लागवड केली होती त्या टरबुजाचे उत्पन्न भरपूर मिळाले असून दीड एकरात पाच लाखाच्या वर उत्पन्न मिळाले असून मेहनत आणि जिद्द याचा मोठा फायदा झाला असल्याचेही यावेळी सागरबाई दिलीप सालेगाये यांनी सांगितले.
सदर नवतरुण जोडप्यांनी चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतीमध्ये घेतल्याने त्यांच्या ह्या कार्याची इतर शेतकऱ्यांनी माहिती घेऊन आपल्या शेतातील उत्पन्नात वाढीसाठी प्रयत्न करावे अशी चर्चा या परिसरात होत असताना दिसत आहे.