Latest Newsआपला जिल्हानांदेडमाहुर

पर्यटकांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ माहुर शहर कडकडीत बंद.

माहुर प्रतिनिधी..

श्रीक्षेत्र माहूर जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथे दि. 22 एप्रिल रोजी पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी 27 पर्यटक व एका स्थानिकाची नृशंस हत्या केली. त्याच्या निषेधार्थ दि.26 एप्रिल माहूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.शिवसेना, भाजप, बजरंगदल,भीमटायगर सेनेने बंदचे आवाहन केले होते.

पहेलगाम येथे अतिरेक्यांनी धर्माची ओळख पटवून 27 निरपराध व निशस्त्र पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करून त्यांचा बळी घेतला होता. त्या घटनेच्या निषेधार्थ माहूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सूर्यवंशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, नगरसेवक सागर महामुने, भीम टायगर सेनेचे शंकर भालेराव, बजरंग दलाचे पवन शर्मा, राजु दराडे यांचेसह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले होते. बंद दरम्यान शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रभारी पो. नि. शिवप्रकाश मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button