Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

खोट्या व बनावट कागदपत्राच्या आधारे तलाठ्याने जमीन केली दुसऱ्याच्या नावे

 

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांने कारवाईसाठी मागितली जिल्हाधिकाऱ्याकडे परवानगी

नायगाव प्रतिनिधी ..

परवानगी न घेता खोट्या व बनावट कागदपत्राच्या आधारे तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावाने केली या प्रकरणी जाब विचारल्यास अरेरावीची भाषा वापरत आहेत. त्यामुळे रुई खु. येथील पिडीत शेतकरी व्यंकट बापूराव बेलकर यांनी तलाठी पांडुरंग हाके यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी यांचेकडे परवानगी मागितली आहे. एका शेतकऱ्यांने कारवाई करण्यासाठी परवानगी मागल्याचा तालुक्यातील पहीलाच प्रकार असल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
नायगाव तालुक्यातील रुई खु. येथील शेतकरी व्यंकट बापूराव बेलकर यांच्या नावे गट क्रमांक १०६ मध्ये १ हेक्टर ६२ आर जमीन आहे. मात्र बळेगाव सज्जाचे तलाठी पांडुरंग हाके यांनी शेतमालकाची कुठलीच परवानगी न घेता ही जमीन पवन व्यंकट बेलकर वय १६ वर्ष अ.पा.क. संगीला व्यंकट बेलकर यांच्या नावे केली. तलाठ्याने फसवणूक केल्याचा प्रकार उशिरा शेतकऱ्याला समजला. त्यामुळे या प्रकरणी सदरच्या शेतकऱ्यांने तलाठी पांडुरंग हाके यांना याचा जाब विचारला सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर अरेरावीची भाषा वापरली तरी शेतकरी व्यंकट बेलकर यांनी पाठपुरावा सुरुच ठेवला त्यामुळे तलाठी हाके यांनी दि. सदरचा प्रकार निव्वळ नजरचुकीने झाला असून फेरफार एका महिण्यात रद्द करण्याचे लेखी दिले होते.
जाणीवपूर्वक आणि अर्थिक व्यवहार करुन तलाठी पांडुरंग हाके यांनी जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केली. हा प्रकार बेलकर यांची उघड उघड फसवणूक करण्याचा असला तरी मागच्या वर्षभरापासून जाणीवपूर्वक केलेला फेरफार रद्द करण्यासाठी टाळाटाळ चालवली आहे. दुसरीकडे त्यांची बोलण्याची भाषाही अरेरावीची असल्याने अन्यायग्रस्त शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे तलाठी हाके यांनी जाणीवपूर्वक गैरमार्गाने स्वतःच्या फायद्यासाठी खोट्या व बनावट कागदपत्राच्या आधारावर उघड उघड माझी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आपल्या स्तरावरुन गुन्हा नोंद करण्यात यावा किंवा गुन्हा दाखल करण्याची परवानगी मला देण्यात यावी असा अर्ज जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे केला आहे.
Img 20250330 Wa0023
Img 20250330 Wa0023
सदरील गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज मिळाल्यानंतर आपल्या स्तरावरुन गुन्हा नोंद न केल्यास, गुन्हा दाखल करण्याची परवानगी न दिल्यास किंवा गुन्हा दाखल करण्याची परवानगी नकारल्यास त्याचबरोबर आपल्याकडून कोणताही पत्रव्यवहार न केल्यास सदरील अर्ज मिळाल्यापासून ९० दिवसानंतर मला प्रस्तुत प्रकरणात नायगाव तालुक्यातील बळेगाव सज्जाचे तलाठी पी.व्हि. हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम २१८ प्रमाणे परवानगी मिळाली आहे (डिम सँक्शन) असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई मा. सक्षम न्यालयाकडून करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे अर्जात व्यंकट बेलकर यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button