Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक करणारा हायवा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे  व स पो. नि. कुंटूर यांनी पकडला.

 

सिद्धार्थ गजभारे कुंटूर ..

 

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे वजीरगाव टाकळी शिवारा मधून रात्री सात वाजून 45 मिनिटांनी MH 26 ,BE 3790 क्रमांकाचा हायवा रेती भरून नांदेड कडे जात असल्याची माहिती पोलीस विभाग व महसूल अधिकारी यांना मिळाली असता पथक घेऊन त्यांचा पाठलाग करून वजीरगाव शिवार रस्त्यावर हायवाला पकडून कुंटूर पोलीस स्टेशन येथे आणले.
सदर हायवा मध्ये पाच ते सहा ब्रास वाळू किमत 30000 रुपयाच्या वर  असून तर हायवा ची किंमत वीस लाख असा एकूण वीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमालासह चालक सचिन शिवाजी राठोड व मालक शिवाजी बालाजी रेडे राहणार मारतळा यांच्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले हे करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
 उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व महसूल मंडळ अधिकारी आर के पवार ,तलाठी सहित पोलीस निरीक्षक विशाल भोसले ,लोणीकर यां पोलीस पथकाने मिळून सदर हायवा पकडून सात वाजून तीस मिनिटांनी कुंटूर पोलीस स्टेशन येथे दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती  आर के पवार यांनी दिली आहे .
कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांमध्ये सध्या रेती माफिया, रेती चोर, माती चोर, व मुरूम चोर सरसावले असून त्यांच्यावर कारवाई होत असताना सुद्धा अवैध रेती वाहतूक करणाऱ्या चोरांचे मनोबळ वाढले आहे . त्यामुळे बिनधास्त अवैध रेती चोरी करण्यास ते पुढाकार घेत आहेत.
 ही  घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडलेली असून सदर हायवा हा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सापडला आहे. सदर हायवा वर कलम 302 (2)3(5)n s प्रमाणे सदर मालक चालक व हायवा वर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button