Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली

किनाळा येथे खरीप हंगाम पूर्व बैठक संपन्न.

 

शंकरनगर प्रतिनिधी..दि.26

 

किनाळा ता.बिलोली येथे खरीप हंगाम पुर्व बैठकीचे आयोजन 24 एप्रिल रोजी ग्रामपंचायत प्रकारांत करण्यात आले होते. सदरील बैठकीत डॉ संतोष चव्हाण शास्त्रज्ञ केव्हीके सगरोळी यांनी फळबाग लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना विविध फळबाग पिकाबद्दल मार्गदर्शन केले. महेश कुरूंद मंडळ कृषी अधिकारी बिलोली यांनी कृषी विभागाच्या विविध फळबाग लागवड योजना व अनुदान याविषयी माहिती दिली.
कृषी सहायक अजय सावळे यांनी मनरेगा अंतर्गत जलतारा प्रकल्प विषयी शेतकऱ्यांना माहिती देऊन प्रवृत्त केले. पुढील खरीप हंगाम पूर्व नियोजन, घरगुती बियाणे वापर, उगवण क्षमता चाचणी, बिजप्रक्रिया चे फायदे ,बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, बेडवर टोकण पद्धतीने लागवड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले .
या वेळी उपसरपंच बालाजी भोसले, ग्राम विकास अधिकारी तुकाराम भायगावे , प्रगतशील शेतकरी माधव भोसले, व्यंकटराव शेळगावे, प्रताप मोहिते, शिवाजी वाघमारे, अविनाश किनाळकर, हौसाजी खराटे, रामेश्वर गायकवाड व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button