Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगावमध्ये धडक कारवाई! मुख्य रस्त्यावरील वाढलेले अतिक्रमण अखेर हटले; नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास…

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव..

नायगाव, दि. 5 डिसेंबर 2025 :
नायगाव शहरातील शिवाजी चौक ते हेडगेवार चौक, हेडगेवार चौक ते शेळगाव रोड, हेडगेवार चौक ते बसस्थानक आणि बसस्थानक ते मद्रेवार कापड दुकान या चारही मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंना झालेल्या वाढत्या अतिक्रमणाविरुद्ध अखेर आज मोठी धडक कारवाई करण्यात आली..अनेक वर्षांपासून नागरिकांकडून होत असलेली मागणी आज पूर्णत्वास आली असून शहरवासीयांनी अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Img 20251206 Wa0024
Img 20251206 Wa0024

ही कारवाई विभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या पुढाकाराने पोलीस विभाग, स्थानिक पोलीस आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त पथकाने पोलीस बंदोबस्तात राबवली. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. शाळकरी विद्यार्थी, प्रवासी व पादचारी यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता.

Img 20251120 Wa00241 1
Img 20251120 Wa00241 1

याच मागणीसाठी भीमशक्तीचे रघुनाथ सोनकांबळे यांनी 1 मे 2025 रोजी महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणाविरोधात अमर उपोषण सुरू केले होते. मात्र मिळालेल्या आश्वासनांवर उपोषण स्थगित करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अखेर आजची कारवाई पाहून त्यांच्या या लढ्याला न्याय मिळाल्याचे स्पष्ट झाले.

Img 20250501 Wa0050
Img 20250501 Wa0050

संयुक्त बैठकीत घेतला निर्णय — लगेच धडक अंमलबजावणी…..
अतिक्रमण हटवण्यापूर्वी 5 डिसेंबर 2025 रोजी दुपारी नायगाव पोलीस स्टेशनमध्ये नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती गंधाली पवार, विभागीय पोलीस अधिकारी पानेगावकर व नगरपंचायत कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. शहरातील नागरिकांची वाढती नाराजी, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आणि वाहतूक कोंडीची गंभीर स्थिती लक्षात घेऊन मुख्य रस्त्यांवरील वाढलेले अतिक्रमण कायमचे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Img 20251206 Wa0025
Img 20251206 Wa0025

मोठ्या व्यापाऱ्यांना मिळाला दणका …          पुढे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई.
आजच्या कारवाईत अनेक धनदांडगे व्यापारी, दुकानदार, तसेच फुटपाथवरील टपरीवाल्यांची अतिक्रमणे हटवण्यात आली. आता पुढे कोणीही.. मोठा व्यापारी असो वा छोटा विक्रेता  रस्त्यावर अतिक्रमण करणार असल्यास त्याच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

मोहीमेत मोठा सहभाग ……या मोहिमेत विभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गंधाली पवार, पो .नी. मारकड, सोपान वळगे, बाबू चेरकुलवार, भोसले, पवार, शिंदे, तसेच नगरपंचायतीचे अभियंता देबेडवार, गजानन कदम, रामेश्वर बापूले, श्रीधर कोलमवार, सूर्यवंशी यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपंचायत स्थापन झाल्यापासूनची ही पहिली मोठी मोहीम नगरपंचायत स्थापन झाल्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणावरची अतिक्रमण हटाव मोहीम प्रथमच राबवण्यात आली. त्यामुळे शहरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात पुन्हा अतिक्रमण वाढू नये आणि रस्ते मोकळे राहावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button