Latest Newsआपला जिल्हानांदेड

घरकुल लाभधारकांना मोफत रेती; पैसे मागितल्यास कडक कारवाईचा इशारा

                                                 

रघुनाथ सोनकांबळे

नांदेड : शासन निर्णयानुसार घरकुल लाभधारकांना त्यांच्या घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास रेती मोफत देण्याची तरतूद असताना, काही ठिकाणी रेती देण्यासाठी अनधिकृतपणे पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत, नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
Screenshot 20260318 084632 Youtube
Screenshot 20260318 084632 Youtube
शासनाच्या नियमानुसार, घरकुल लाभधारकांनी स्वतःच्या वाहनातून रेती उचलून नेण्याची सुविधा असून, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाऊ शकत नाही. मात्र, काही लिलावधारक व संबंधितांकडून लाभधारकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राहुल दत्ता जिगळेकर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत, अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “घरकुल योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाने मोफत रेतीची सुविधा दिली आहे. मात्र, पैसे मागणे हा शासन निर्णयाचा भंग असून, संबंधितांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.”
प्रशासनाकडूनही नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, घरकुल लाभधारकांनी कोणालाही पैसे न देता, फक्त स्वतःच्या वाहनाचा खर्च करून मोफत पाच ब्रास रेती घ्यावी. तसेच, कुणीही पैसे मागितल्यास तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी.
Screenshot 20260318 084736 Youtube
Screenshot 20260318 084736 Youtubeदरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लिलावधारकांवर दंडात्मक कारवाईसह ठेका रद्द करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही संकेत प्रशासनाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button