Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

तालुका कृषी कार्यालयातील अपंग कर्मचाऱ्यांना एका शेतकऱ्याकडून पी एम किसान योजनेचे काम न केल्याने कार्यालयात घुसून बेदम मारहाण

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव शहरातील तालुका कृषी कार्यालयात जावून टाकळी तमा येथील शेतकरी रवी आनंदा झरीकर यांने दोन्ही पायाने अपंग असलेले कर्मचारी सुचीत सत्यपाल राउत यांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याने कर्मचारी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.सदर घटना गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडली .या मारहाणीच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील टाकळी तमा येथील शेतकरी रवी झरीकर यांनी पी.एम. किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा फायदा घेण्यासाठी नियमा प्रमाणे कागदपत्रासह प्रस्ताव दाखल केला नाही.त्यामुळे त्यास पी.एम किसान योजनेचा लाभ मंजूर झाला नाही.
गुरुवारी झरीकर हा दुपारी कृषी कार्यालयात येवून मला किसान योजनेचा लाभ का मिळत नाही .माझा प्रस्ताव का मंजूर झाला नाही. याचा जाब दोन्ही पायांनी अपंग असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारला असता तुम्ही कागदपत्रासह प्रस्ताव दाखल केला नाही .तो अपूर्ण असून तो पूर्ण कागदपत्रासह दाखल करण्याचा सल्ला दिला असता रवी झरीकर हा अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता कार्यालयातील जबाबदार कर्मचारी सूर्यवाड व भुताळे हे संबधीतास असलेली अडचण समजावून सांगत असतानाच त्यांनी राउत यांना लाथा बुक्याने मारहाण करत अश्लील शिवीगाळ सुरू केली.
अचानक अन अपेक्षित घटना घडल्याने कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यासह सर्वच भयभीत झाले.कार्यालयात प्रामाणिक पणे काम करणाऱ्या अपंग कर्माचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याने कर्मचाऱ्यानी निषेध व्यक्त केला असून या बाबद वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.
 या सर्व अनपेक्षित घडलेल्या प्रकरणानंतर प्रकरण सर्व पोलिसात गेल्या ने रवी झरीकर या शेतकऱ्याचे नातेवाईक व गवातील काही प्रतिष्ठित गाव लीडर पोलीस ठाण्यात येऊन जे झालेला प्रकार निंदनीय आहे . संबंधित शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करू नका आम्ही त्या कर्मचाऱ्यांची माफी मागतो प्रकरण वाढवू नका अशी गयावया पोलीस स्टेशनमध्ये करत असल्याचे तेथील कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
 जर कुणीही शेतकरी तालुका कृषी कार्यालयात येऊन बेजबाबदारपणे कर्मचाऱ्यांना मारहाण करून पुन्हा प्रकरण रपादफा करा मिटून घ्या असे म्हणून कर्मचाऱ्यांचे खाजगीकरण करत असल्याने कर्मचारी भव्य झाले आहेत.
■ दोन्ही पायांनी अपंग असलेले सुजीत राउत यांचा मागील चार महिन्या पासून पगार नाही तरी ते नियमित कार्यालयात येवून प्रामाणिक पणे शेतकऱ्यांची कामे नियमा प्रमाणे करीत आपली सेवा बजावत असताना त्यांना अशा पध्दतीने मारहाण करण्यात आल्याने तालुक्यातील कर्मचारी वर्गात संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी नोकरी कशी करायची हा सवाल करीत आहेत.■

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button