Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष, तात्कालीन वैद्यकीय अधिक्षकांनी संगणकाचे पासवर्ड बदलल्याने नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज ठप्प

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव…

नायगाव ग्रामीण रुग्णालयातील संगणकाचे पासवर्ड तात्कालीन वैद्यकीय अधीक्षक श्रीमती अपर्णा पपुलवाड यांनी बदलून टाकल्यामुळे आणि त्याच्या पासवर्ड कार्यालयीन कामकाज प्रमुख प्रमुखांना दिले नसल्याने या रुग्णालयाच्या कामकाजाचा पूर्णता खेळ खंडोबा झाला आहे.अनेक कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात झाली आहे.या खट्याळपणाच्या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पेरके यांच्या कडे करण्यात आली पण या प्रकरणी संबंधितावर अद्याप कुठलीही कार्यवाही केली नसल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे.

आरोग्य मंत्रालय, उप संचालक व जिल्हा शल्यचिकित्सक वरिष्ठ पातळीवरून शासकीय कामकाजा बाबद महत्त्वाचे व अति तातडीचे येणारे ई-मेल, सह अन्य दैनंदिन कामकाजाचे संगणक प्रणाली द्वारे होणारे पत्रव्यवहार तात्कालीन वैद्यकीय अधिक्षक यांनी संगणकाचे पासवर्ड बदलुन टाकल्याने कामकाज ठप्प झाले आहे .
ग्रामीण रुग्णालयातून दिले जाणारे दिव्यांग प्रमाणपत्र जन्म मृत्यूची नोंद हे संबंधितांना उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे पासवर्ड उपलब्ध होत नसल्याने प्रमाणपत्र वितरणाचे कामकाज खोळंबले आहे.या बरोबरच दैनंदिन कामकाजात मोठी अडचण निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांच्या पगारीही याच कारणामुळे रोखल्याने त्यांची दिवाळी ही अंधारात झाली आहे. याबाबतची सविस्तर तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक पेरके यांच्याकडे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी केली असून ते याबाबत काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पेरके हे नायगाव तालुक्यातील भुमी पुत्र असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची त्यांच्या कडून मोठ्या अपेक्षा आहेत.पण नागरिकांच्या अपेक्षेच्या नेमके उलटे घडत आहे.कारण नायगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पार रसातळाला गेला आहे.शिपाई एक्सरे काढतो आणि १०८ चे कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची तपासणी करतात हे गंभीर प्रकरण आहे.नायगाव ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभार व डाॅ.पेरके यांच्या अकार्यक्षम कारभाराच्या तक्रारी आरोग्य मंत्रालयापर्यंत गेल्या असल्याने हे प्रकरण त्यांना ही शेकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button