Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

जल जीवन  योजनेच्या पाण्यावर सालेगावच्या सरपंचांनी मारला डाव अण फुलवली हळद….. चौकशी करण्याची  गावकऱ्यांकडून मागणी …..

 

 सिद्धार्थ गजभारे कुटुंर…..

नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे सालेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच प्रतिनिधी बालाजी लव्हाळे यांच्या शेतातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहीर खोदण्यात आली. सदर विहीर खोदून गावामध्ये टाकी बांधून पाईपलाईन करून गावकऱ्यांना पाणी मिळावे या उद्देशाने सदर विहीर खोदून एक कोटी एकवीस लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती ही ग्रामपंचायत मार्फत देण्यात आली .

 

सदर जलजीवन मिशन योजना गेल्या चार वर्षापासून सालेगाव येथे रखडले असून गावातील नागरिकांना दोन ते तीन हजार रुपये महिना खाजगी लोकांना देऊन पाणी विकत घ्यावे लागते आहे .ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठ्याची कोणती सोय आजपर्यंत झाली नसल्याचे चर्चा होत आहे.गावात ग्रामपंचायतीकडून पाईपलाईन टाकून नळे देणार असे सांगितले मात्र अद्याप तीन वर्षाच्या कालावधी लोटला तरीही गावात पाणी मिळत नाही . अशा भयान संकटकाळी जलजीवन योजनेच्या पाण्याच्या विहिरीवर सरपंचांनी मात्र हळदीसह   विविध पिके घेऊन स्वतःचे मात्र चांगभलं करून घेत असल्याची चर्चा मात्र जोरदार होत आहे.

 

या सरपंचाचे गाव सुधारणेकडे लक्ष नसून स्वतःकडे लक्ष जास्त असल्याचे  दिसून येत आहे. गावकऱ्यांना गावात  अनेक त्रास सहन करावा लागत असून गावात हातपंपही ना दुरुस्त आहेत . गावात   स्वच्छता तर वर्ष भर केली जात नाही .त्यातच ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणाऱ्या वीहिरीवरच सरपंचानेच पाईपलाईन टाकून आपल्या शेतीला पाणी देऊन स्वतःचे चांगभले करून घेतले आहे.  .त्यामुळे सदर सरपंच व ग्राम विकास अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार सालेगाव येथे चालत आहे .असे स्पष्ट नागरिकांतून बोलल्या जात आहे . वरिष्ठ अधिकाऱ्याने याची वरिष्ठ पातळीवरून तात्काळ अशा सरपंचाची चौकशी करून  जलजीवन मिशन योजनेचे पाणी गावकऱ्यांना पुरवठा करण्यात यावा अशी मागणीही यावेळी गावकऱ्यांनी केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button