Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

शहीद पोचीराम कांबळेच्या पराक्रमाची जाण समाजाला असावी,रविंद्र भालेराव

रघुनाथ सोनकांबळे…………

नामांतर लढ्यामधील महान योद्धा शहीद पोचिराम कांबळे यांची समाजाप्रती निष्ठा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी नसानसात भरलेला स्वाभिमान किती जाज्वल्य होता हा इतिहास आपल्यापुढे असताना त्यांच्या पराक्रमाची जाण समाजातील तरुण युवकांना असावी असे प्रखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव यांनी अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले.
नायगाव तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथे शहीद पोचीराम कांबळे यांच्या जन्मस्थानी सत्यशोधक समाज महासंघाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी दिग्दर्शक भीमपुत्र टेक्सास गायकवाड कोल्हापूर,सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष डी एस नरसिंगे,मानवी हक्क अभियानचे नेते मच्छिंद्र गवाले, लसाकामचे नरसिंग घोडके, पत्रकार माधव बैलकवाड,अँड सूर्यवंशी, मंगलाताई कांबळे, डॉक्टर उत्तम कांबळे,डॉक्टर उत्तम इंगोले,टेंभुर्णीचे पोलीस पाटील सतार पठाण व शहीद पोचीराम कांबळे यांचे वीरपुत्र बाबुराव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Img 20250805 Wa0035
Img 20250805 Wa0035
प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा सह शहीद पोचिराम कांबळे व शहीद चंदर कांबळे यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो शहीद पोचिराम कांबळे अमर रहे अशा प्रचंड घोषणा देण्यात आल्या, शहीद पोचिराम कांबळे यांच्या शहीद दिनाचे औचित्य साधून शहीद पोचिराम कांबळेच्या जीवनावर दिग्दर्शक लेखक टेक्सास गायकवाड यांनी निर्माण केलेल्या हिंदी चित्रपटाच्या स्क्रीष्टचे उद्घाटन करण्यात आले. रवींद्र भालेराव पुढे म्हणाले की औरंगाबाद येथील तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणी करिता पोचिराम कांबळे यांनी तीव्र लढा पुकारला या लढ्यात तो बलिदान ही देऊन महाराष्ट्रातील पहिला शहीद ठरला ही जाण समाजातील आजच्या तरुणांना असावी कारण समाजावर विविध प्रकारचे आज अन्याय अत्याचार होतात ही किंकाळी तरुणाने ऐकून पोचीराम कांबळे या वाघासारखी डरकाळी फोडावी असेही ते म्हणाले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एल दाडेराव यांनी केले तर यावेळी गौतम काळे,भागवत कांबळे, पि के गायकवाड यासह विविध गावातून आलेल्या अनेक कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button