Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत घुंगराळा ते सावरखेड  रस्ता सुधारणेचे काम बोगस व निकृष्ट दर्जाचे… काम बंद करून चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी.

   मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रतिमा_ 38 घुंगराळा ते सावरखेड रस्त्याची सुधारणा करण्यासाठी शासनाचे करोडो रुपये खर्च.. तरी पण कामाचा बट्ट्याबोळ काम मात्र निकृष्ट दर्जाचे चौकशी करण्याची ग्रामस्थांचीमागणी…

रघुनाथ सोनकांबळे नायगाव..

 महाराष्ट्र शासन खेड्यापाड्यातील वाडी तांड्यावरील गावे मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना प्रमुख राज्य मार्ग किंवा प्रमुख शहरास जोडणे साठी करोडो रुपये खर्च करीत आहे. पण त्या करोडो रुपयाचा चुराडा मात्र संबंधित गुत्तेदारच करीत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रतिमा- 38 घुंगराळा ते सावरखेड या रस्त्यावर महाराष्ट्र शासनाने करोडो रुपये खर्च करून सावरखेड हे गाव राज्याच्या मुख्य राज्यमार्ग्याला जोडण्याचा प्रयत्न केला खरा पण या कामाचे “तीन तेरा नऊ अठरा” या म्हणी प्रमाणे काम करण्यात येत असल्याचे निदर्शनास गावकऱ्यांनी आणून दिले आहे.
20250317 163210
20250317 163210
घुंगराळा ते सावरखेड हा रस्ता नियमाने सुधारणा करण्यासाठी मातीकाम, खडी काम, जे दोन थर टाकून त्यावर खडी टाकने, दबाई करून पाणी व स्क्रीनिंग मुरूम टाकून परत दबाई करणे हे केवळ डांबर काम करणे अगोदरची प्रक्रिया शासन अंदाजपत्रकानुसारआहे. ही कोणतीही प्रक्रिया न करताच या रोडवर डांबर करणे सुरू झाले असून हे सर्व काम केवळ बोगस होत आहे.
20250317 163519
20250317 163519
.एवढेच नव्हे तर सदर रोडवर सुधारणा झाल्यानंतरही तोच गुत्तेदार तो रोड पुढील पाच वर्ष देखभाल करावा अशी तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली .मात्र पुढे पाच वर्ष देखभाल करणे अगोदरच त्या कामाचा बट्ट्याबोळ होत असताना दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने रजिस्टर गुत्तेदार बी जी भास्करे यांना या होत असलेल्या कामाचे गुत्ते दिले असले तरी ते काम मात्र कोणीतरी पल्लेवाड अभियंता हे काम करीत असल्याचे गावकऱ्यांकडून बोलल्या जात आहे.
20250317 163405
20250317 163405
.मूळ गुत्तेदार काम न करता कोणत्यातरी अभियंत्याला काम देऊन मोकळा होतो. आणि त्या कामाची ठरवलेली टक्केवारी घेतो. म्हणून हे काम बोगस व निकृष्ट होत असल्याचे या सावरखेड गावात चर्चिले जात आहे. काम कोणीही करो होत असलेले काम मात्र शासनाला करोडो रुपयांचा चुना मात्र लागत आहे. अशा परिस्थितीत रजिस्टर गुत्तेदाराकडुन काम होत नसेल तर त्यांच्याकडून शासनाने काम काढून घ्यावे व परत ते काम दुसऱ्या रजिस्टर गुत्तेदारामार्फत करून घ्यावे .अशीही मागणी या परिसरात होत आहे.
20250317 163200
20250317 163200
. या घुंगराळा सावरखेड मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होणारे रस्त्याचे काम अगदी बोगस होत असून संबंधित विभागाने तात्काळ या कामाची चौकशी करून काम थांबवून पुन्हा सदर काम शासन नियमानुसार करण्यात यावे अशीही मागणी या परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button