Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
कुटुंर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार सौ. सविता देवराव नारे – जनतेत उत्साहाचे वातावरण

सिद्धार्थ गजभारे गुंटूर…..
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या 2025 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सौ. सविता देवराव नारे (राहणार डोंगरगाव) या जनतेच्या समाजकार्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कुंटूर जिल्हा परिषद सर्कलमधील 23 गावांमध्ये मूलभूत सुविधा जसे की रस्ते, वीज, पाणी, दळणवळण व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी या अद्यापही सुटलेल्या नाहीत. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे विकास कामे न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मागील जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्ष यांनी कोणतेही ठोस काम न केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची जनतेत उत्सुकता दिसत आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर, गरीब व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या सौ. सविता नारे यांनी सांगितले की, “मी जनतेच्या सेवेसाठी, समाजाच्या भल्यासाठी आणि विकासाच्या कामांसाठी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी मला साथ दिली तर निश्चितच कुंटूर सर्कलमधील विकासाच्या कामांना नवे बळ मिळेल.”
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा नांदेड यांच्यातर्फे त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्या ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहेत. डावी लोकशाही आघाडी तसेच समविचारी पक्षांसोबत सहकार्याने निवडणूक लढवण्याबाबतही त्या सकारात्मक आहेत.



