Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
फेक बातम्यांचा धुरळा; ‘लाडकी बहीण’ संभ्रमात नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता रखडला; लाभार्थी बहिणींमध्ये नाराजीचा सूर

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव
लाडकी बहीण योजनेला सुरूवात होऊन जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आले असताना पहिल्यांदाच लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. आतापर्यंत एकही हप्ता न चुकता वेळेवर मिळत असताना, यंदा नोव्हेंबर व डिसेंबर असे सलग दोन महिने हप्ता न मिळाल्याने ‘लाडक्या बहिणी’ प्रश्नचिन्हाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
दर महिन्याच्या दहा तारखेच्या आसपास खात्यात जमा होणारा हप्ता हा अनेक गरजू महिलांसाठी आधाराचा कणा ठरला होता. मात्र सोशल मीडियावर पसरत असलेल्या फेक बातम्या, नियमावलीतील बदल, वेतन कपात आणि अपात्रतेच्या निकषांमुळे अनेक महिलांना योजनेपासून वंचित व्हावे लागले. ज्यांना या योजनेची खरोखर गरज आहे, त्यांच्यापर्यंतही हप्ता न पोहोचल्याने नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.
“आज डिसेंबर अखेर होत आला, तरी खात्यात पैसे नाहीत. अर्ज मंजूर आहे की नाही, हप्ता येणार की नाही—काहीच स्पष्ट माहिती नाही,” अशी भावना अनेक लाभार्थी महिलांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून ठोस खुलासा नसल्याने संभ्रम वाढत चालला आहे.



