
खासदारासह अनेक शहरातील नेते मंडळी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
. नायगाव प्रतिनिधी दि.(७)
दिनांक 18 मार्च 2025 रोजी भोसले गडी वेरूळ येथून सुरू झालेली जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान हे आपले टप्पे पूर्ण करत आज नायगाव शहरात दाखल झाली .

शहरात आल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे खासदार नायगाव चे भूमिपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या सहकार्यासह संपर्क कार्यालयाच्या समोर या जिजाऊ रथयात्रेचे भव्य असे स्वागत केले. आणि सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वयंसेवकांच्या नाष्ट्या, चहा, पाण्याची व्यवस्था करून व मा जिजाऊ च्या पूर्णाकृती रथातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नेते शिवराज पाटील होटाळकर हे उपस्थित होते. रथयात्रा संपर्क कार्यालयातून बाहेर निघत असताना यमुनाबाई हायस्कूल व मिलेनियमच्या विद्यार्थिनींनी लेझीमच्या पथकासह जिजाऊ यात्रेच्या समोर पतसंचलन करीत होते .रथयात्रा संपर्क कार्यालया पासून शिवाजी चौकात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. जीवन चव्हाण व शिवानंद पाटील वडजे यांनी जिजाऊच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दर्शन घेतले.




