Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ नायगाव कडकडीत बंद; व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा..

रघुनाथ सोनकांबळे….

दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नायगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
20260723 112602
20260723 112602
शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यापार व व्यावसायिक आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शविला.विशेष म्हणजे, आज नायगावचा आठवडी बाजार असतानाही शहरातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवत बंदमध्ये सहभाग नोंदविला.त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठेत शुकशुकाटात दिसून आला.
20260723 113121
20260723 113121
शहरातील हेडगेवार चौक येथे आंदोलकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत भारत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यास जबाबदार असलेल्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
या बंदमध्ये नायगाव शहरासह तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बंद आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी नायगाव पोलिसांनी विशेष खबरदारी घेत शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
20260723 114551
20260723 114551
पोलीस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होती. आंदोलकांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची भूमिका घेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली.
पोलीस प्रशासन आणि आंदोलकांच्या समन्वयामुळे नायगाव शहरातील महाराष्ट्र बंद पूर्णपणे शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्याआंदोलनकर्त्यांनी महामार्गावरच हेडगेवार चौकात नायगाव पोलिसांना व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना निवेदन सादर केले.
20260723 114621
20260723 114621
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते भगवानरावं अचोलीकर, माजी तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर, माजी शहराध्यक्ष सतीश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते कपिल डुमणे, माजी जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे, मिलिंद बचाव ,बालाजी रातोळीकर, बाळासाहेब सोनकांबळे, राजू भद्रे, विनोद भालेराव, संतोष भालेराव ,अविनाश गायकवाड, ज्योतिबा वाघमारे ,मुरली भद्रे ,धम्मानंद मांजरमकर, गौतम हनुमंते, नामदेवराव भद्रे ,सुधाकर भद्रे, कैलास भद्रे, प्रशांत वाघमारे ,सिद्धार्थ वाघमारे, शुद्धोधन लांडगे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button