नायगाव तालुक्यात सामाजिक न्याय विभागाकडून चालवले जाणारी मुलांची निवासी शाळा व वसतिगृह आणि दुसऱ्या बाजूला चालू असलेले निवासी वस्तीग्रह या दोन्हीही ठिकाणच्या एकना अनेक तक्रारी चालूच आहेत. कधी विद्यार्थ्यांना भोजन मिळाले नाही, तर कधी विद्यार्थ्यांना स्टेशनरी मिळाली नाही, तर कधी इथल्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्रास दिला, तर कधी विद्यार्थी न शाळा न वस्तीग्रह अशा दोन्हीच्या मध्ये फिरकत असताना आढळून येतात, अशा या सामाजिक न्याय विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मागच्या काही महिन्याखाली बळेगाव येथील एका तरुण विद्यार्थ्यांचा पाण्यात पोहतना जीव गेला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये अशी ही चर्चा होत आहे.
सध्या तर निवासी वस्तीग्रहात जेवणाच्या भानगडीतून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. संबंधित ठेकेदाराकडून वस्तीगृहात मिळणारे भोजन शासन नियमाप्रमाणे मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत असताना दिसत आहेत. शासन नियमाप्रमाणे जो मेनू ठरवून दिलेला आहे त्या मेनू प्रमाणे संबंधित ठेकेदार एकाही दिवशी भोजन, नाष्टा, फळ प्रूफ देत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून ऐकावयास मिळत आहेत .अशातच निवासी वस्तीगृहात अधीक्षक हे पद रिक्त असल्याचे कळते .सदर पद रिक्त असल्याने येथील विद्यार्थ्यांची व्यवस्था वाऱ्यावर पडल्याचेही दिसून येत आहे .दुसऱ्या बाजूला निवासी शाळा असून त्या निवासी शाळेत सुद्धा अधीक्षक उपस्थित राहत नाहीत. मुख्याध्यापक कधी असतात कधी नसतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अनेक पालकांनी या संदर्भात वरिष्ठांना तक्रारी सुद्धा केल्या आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकारी या दोन्हीही युनिटकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळी या दोन्हीही निवासी शाळा व वस्तीगृहातील पूर्ण व्यवस्था संबंधित ठेकेदाराच्या लेबर कडून पाहिली जात असल्याचे चित्र दिसत आहे. येथील लेबरच जे ड्युटीवर आहेत तेच दोन्ही कडचीही बाजू सांभाळत असल्याचे दिसुत आले आहे. या सर्व प्रकरणाशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता सदरील अधिकाऱ्यांनी संबंधित शाळा आणि वस्तीग्रहात नीटनेटकी व्यवस्था असल्याचे सांगितले असून भोजन संदर्भात संबंधित ठेकेदाराला नोटीस सुद्धा देण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. परंतु या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. अशातच येथील निवासी शाळेतील मुख्याध्यापक यांच्यावर वार्डनची जबाबदारी टाकल्याने येथील मुख्याध्यापक ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत कारण मी एक शिक्षक आहे आणि माझा पेशा विद्यार्थ्यांना शिकवण हेच आहे वार्डन म्हणून मी कसं काय काम पाहू शकतो असेही संबंधितांकडून ऐकावयास मिळाले आहे. या दोन्हीही युनिटकडे एकाच ठेकेदाराकडून जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था केली जाते ती व्यवस्था कुचकामी असून विद्यार्थ्यांना वेळेवर भेटत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून ऐकावयास मिळाली.
जर विद्यार्थी कोणाच्या समोर सांगत असेल तर त्यांना दम दिल्या जात आहे की तुमची शाळेतून टीसी काढण्यात येईल किंवा वस्तीगृहातून नाव कमी करण्यात येईल अशी ही चर्चा या विद्यार्थ्यांमध्ये होत असताना दिसत आहे. काल दिनांक ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी अचानक एका पत्रकाराने सदर वस्तीगृहात भेट दिली असता त्या ठिकाणी निवासी शाळेतील अधीक्षक किंवा मुख्याध्यापक कोणीही हजर नव्हते .व दुसऱ्या युनिट कडे सुद्धा वार्डन किंवा अधीक्षक हजर नसल्याचे दिसून आले त्याच्यावरून असे स्पष्ट होते की ही अधीक्षक, वार्डन आणि मुख्याध्यापकाची जबाबदारी येथील गुत्तेदाराच्या लेबर च्या भरोशावर सोडून दिल्याचेही दिसून आले की आहे .अशा या गंभीर बाबीकडे जिल्ह्यावरील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन या दोन्हीही युनिटमधील दुरुस्ती करून घेण्याची गरज असल्याचेही पालकांमध्ये बोलल्या जात आहे.