Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

सीसीटीव्हीच्या फुटेजने गो-तस्करीचा पर्दाफाश रामतीर्थ पोलिसांची धडक कारवाई; तिन आरोपी अटकेत, XUV वाहन जप्त

 

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव..

पोलीस स्टेशन रामतीर्थ हद्दीत दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०५:२२ वाजता नरसी ते बिलोली मार्गावर मध्यवर्ती बँकेसमोर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. रस्त्याच्या दुभाजकावर बसलेल्या गाय व वासराला लक्ष्य करून वासराची जबरदस्तीने गाडीत टाकून तस्करी करण्यात आली, तर आई गाय आपल्या वासरासाठी हळहळत त्या वाहनाभोवती फिरत असल्याचे दृश्य तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे टिपले गेले.
Screenshot 20260205 205156 Whatsappbusiness
Screenshot 20260205 205156 Whatsappbusiness
या अमानवी कृत्याची गंभीर दखल घेत पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे गुन्हा रजिस्टर नंबर १०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजच्या ठोस आधारावर तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
Screenshot 20260205 205253 Whatsappbusiness
Screenshot 20260205 205253 Whatsappbusiness
पोलीस अधीक्षक आंबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे कारवाई करत गो-तस्करी व चोरी करणाऱ्या तिन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी मोहम्मद अजीम मोहम्मद सिराज, रा. नांदेड ,शेख आश्रम पिताशकेल, रा. मनोर, ता. मनोर, जि. पालघर ,आयुब खान, रा. मुंब्रा, जि. ठाणे हे आहेत
Screenshot 20260205 205253 Whatsappbusiness 1
Screenshot 20260205 205253 Whatsappbusiness 1
या गुन्ह्यात वापरलेले XUV चारचाकी वाहन ही पोलिसांनी जप्त केले असून, सदर आरोपी सध्या रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत आहेत.
सीसीटीव्हीच्या अचूक फुटेजातुन गुन्हेगारांपर्यंत पोहोचणारी ही कारवाई रामतीर्थ पोलिसांच्या सतर्कतेचे, कार्यक्षमतेचे कौतुकास्पद उदाहरण ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button