Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

कुंटूर येथील जि.प.शाळेच्या शेजारी अजूनही काही ठिकाणी अवैध दारू विक्री सुरूच. 

  सिद्धार्थ गजभारे कुटुंर

 

नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारा शेजारीची अवैध दारू विक्रीची समस्या अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. अनेक ठिकाणी पोलिसांच्या कारवाईनंतरही, अजुनही काही लोक खुलेआम अजूनही अवैध दारूविक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

. तळीराम जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दारू पिऊन त्या दारूच्या बाटल्या त्याच ठिकाणी फोडत आहेत. या मुळे सकाळी शाळेतील परिपाठाच्या वेळेस शाळकरी मुलांना बसण्यासाठी अनेक समस्येचा सामना करावा लागत आहे . तळीरामाने दारूच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यावर , शाळेत फोडल्याने यावे कसे, जावे कसे व परिपाठाला बसावे कसे अश्या अनेक समस्यांना शाळकरी मुलांना तोंड द्यावे लागत आहे.हा प्रकार कधी थांबेल या कडे शाळेतील विद्यार्थी, पालक वर्ग, व शिक्षक वर्गात चर्चा होत आहे .

पोलिसांकडून यांच्यावर अधिक कठोर कारवाईची आवश्यकता आहे. यामध्ये, दारूविक्री करणाऱ्यांवर छापे टाकणे, त्यांना अटक करणे, आणि त्यांच्याकडील दारूचा साठा जप्त करणे, अवैध दारूविक्रीमुळे समाजावर आणि विशेषतः तरुणांवर नकारात्मक परिणाम होतो. या कामात सामील असलेल्या लोकांवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी  मागणी येथील पालकातुन होते असताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button