Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

कुंटूर येथील ग्रामपंचायत चा कारभार ठेपाळला करोडो रुपयांच्या निधीचे ग्रामसेवक सरपंचच्या मनमानी पद्धतीने विल्हेवाट

दोन वर्षात दोनच ग्रामसभा नागरिकास वेटीस धरण्याचां प्रकार

कुंटूर प्रतिनिधी…
नायगाव तालुक्यातील कुंटू र येथील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते नागरिकांनी ग्रामपंचायतील सर्व सदस्यांना बिनविरोध काढून बिनविरोध ग्रामसभा नावा रूपाला आलेली आहे.
गावात करोडो रुपयाचा निधी आला तरीही नागरिकांच्या समस्या मात्र सुटत नाहीत याला जबाबदार ग्रामविकास अधिकारी व सरपंच आहे.
मात्र सरपंच म्हणतात की मला कोणीही निवडून दिले नाही. त्यामुळे मला कोण बोलायची गरज नाही ग्रामविकास अधिकारी महिना महिना गावात येत नाहीत. ते साहेबांचे चेले आहेत .असे स्पष्ट उत्तर नागरिक त्यांना दिले आहे. ग्रामसेवक हे मोठया लोकांच्या ताटाखालचे मांजर झाल्यासारखे स्पष्ट दिसत आहे. कुंटूर येथील सत्तर वर्षाचा काळ लोटलां भोई समाजातील काही नागरिकांना आजपर्यंत घरकुल मिळाले नाही .अशी संतप्त प्रक्रिया निलेवार यांनी दिली आहे .त्यामुळे आम्ही गावचे रहिवासी नाही का नागरिक नाही का आम्ही टॅक्स भरतो तरीही आमचे नाव घरकुल यादीत का आले नाही .आम्हाला आजपर्यंत घर का मिळाले नाही अशी उत्तर गावातील प्रतिष्ठित नागरिकांना विचारले असतात त्यांनी सांगितले की हे माझ्या हातात नाही ते वरूनच आलेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत 70 वर्षाचा काळ लोटला तरी वडिलांना ही व मलाही घर मिळाले नाही . असे भगवान निलेवार यांनी सांगितले . त्यामुळे कुंटूर येथील ग्रामपंचायत कारभार म्हणजे आंधळ दळते कुत्र पीठ खाते असा असल्याचे स्पष्ट उत्तर या संतप्त भगवान निलेवार यांनी बोलून दाखवले. येथील ग्राम विकास अधिकारी हे वरिष्ठ लोकांच्या ताटाखालचे माजर आहेत .त्यांनी सांगितलं तर सही मिळते त्यांनी सांगितले त्याच काम होते गावातील रस्ते , शुद्ध पाणी नाही पाणीपुरवठ्याचे निकृष्ट काम विविध घरकुलांचे निकृष्ट काम कित्येक घोटाळा होत आहे. दोन वर्षात फक्त दोनच ग्रामसभा झाल्या असून त्याचेही चौकशी गुलदस्त्यात असून ग्रामविकास अधिकारीची चौकशी का होत नाहीं संतप्त प्रक्रिया नागरिकांनी वरिष्ठाकडे केले आहे. तरीही वरिष्ठ त्यांना पाठीशी घालत असल्याचे नागरीकानी सांगितले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button