Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

कांडाळा येथील पंचायतीच्या निधीतून नळजोडणी न दिल्याने ग्रामस्थाचा संताप

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव ….

ग्रामसेवक बालाजी रातोळीकर व उपसरपंच रमेश जाधव यांना नळ जोडणी साठी विनंती करूनही यांनी नळ जोडणीसाठी   स्पष्ट नकार दिला आहे  ..  अशाप्रकारे अधिकाऱ्याकडून कडून आडवणुकीचा प्रकार होत असल्याचा तक्रारदाराने आरोप केला आहे  .

 नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील रहिवासी यलप्पा मोतीराम इरेवाड यांनी ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत जिल्हा परिषद नांदेड येथे निवेदन दिले आहे.
इरेवाड यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून गावातील नवीन पाईपलाईन टाकली असून, त्या पाईपलाईनला नळजोडणी देण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामसेवक बालाजी रातोळीकर यांच्याकडे अर्ज सादर केला होता. मात्र, त्यांनी दोन हजार रुपये घेतल्यानंतरही नळजोडणी देण्यात आलेली नाही, तसेच नळयोजनेच्या निधीतून उर्वरित रक्कम इतरत्र खर्च करण्यात आली असल्याचा त्यांचा आरोप आहे.
तसेच, संबंधित ग्रामसेवकांनी नळजोडणी देण्यास टाळाटाळ करून अर्जदारास शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही इरवाड यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे त्रस्त होऊन त्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर चौकशी करून स्वतःच्या नावावर नळजोडणी देण्याची मागणी केली आहे.
इरेवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे की, योग्य तो न्याय न मिळाल्यास ते व त्यांचे कुटुंब उपोषण बसण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार व ग्रामविकास अधिकाऱ्यांना याची प्रत पाठवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button