सद्यस्थितीत देशाचे आणि राज्याचे राजकारण जाती धर्मानीच चालले आहे विकास मात्र कुठेच दिसत नाही यावर काही जागरूक मतदार निश्चितपणे विचार करीत आहेत नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल हे ओबीसी महिलेसाठी आरक्षित असल्याने ज्यांच्या हाती दायित्व पूर्वीपासूनच आहे गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामे पारदर्शकपणे केलेली असल्याने कुंटूर सर्कल मधील मौजे शेळगाव छत्री येथील श्रीमती अहिल्याबाई बालाजीराव पाटील चोंडे यांनाच कुंटूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी असे जागरूक नागरिकांचे ठाम मत आहे.
मौजे शेळगाव छत्री येथील स्वर्गीय बालाजीराव पाटील चोंडे यांचे कुटुंब गेल्या तीन पिढ्या पासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षात काम करीत ते स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या घराण्याशी एकनिष्ठ पणे आहेत ते सर्वश्रुत आहे.लोकनेते कै. बळवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात कै. गणपतराव पाटील चोंडे हे देखील एकनिष्ठपणे राहिले तर स्वर्गीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या कारकिर्दीत शेळगाव छत्रीचे माजी सरपंच बालाजीराव पाटील चोंडे हे एक जिवलग साथी खंदे समर्थक म्हणून होते आणि खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून संजय पाटील चोंडे यांची सर्वत्र ओळख आहे गेल्या तीन पिढ्यापासून एकनिष्ठ पणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रेम करणारे आणि नायगावच्या चव्हाण घराण्याशी अतिशय जवळीकता असलेले शेळगाव छत्री येथील बालाजीराव चोंडे यांच्या पत्नी श्रीमती अहिल्याबाई चोंडे यांना काँग्रेस पक्षाने कुंटूर सर्कल मधून उमेदवारी देणे योग्य ठरेल, कारण चोंडेचे गावासह इतर गावात सामाजिक कामात भरीव योगदान आहे नायगाव तालुक्यात समाजासाठी एक सभागृह असावे असे अनेकांचे मत होते सामाजिक कामात अग्रेसर असलेले बालाजीराव चोंडे यांच्याकडे समाजाने ही मागणी घातली स्वर्गीय चोंडेनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवीत आपली स्वतःची रोड जवळची पाच गुंठे जमीन सभागृहासाठी दान म्हणून दिली तर तत्कालीन आमदार वसंतराव चव्हाण यांनी 15 लाख रुपये देऊन सभागृह बांधून दिले यावरही समाजाचे समाधान झालेले नव्हते तेव्हा दुसऱ्या जागी 15 गुंठे जमीन दान म्हणून चोंडाने दिली आणि माजी खासदार विकास महात्मे यांच्या निधीतून 67 लाख रुपयाची मंजुरी मिळवून आणली काही बांधकाम देखील झाली आहे.
वर्षभरात अनेक लहान मोठे सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबवीत अन्नदान करणे यामध्ये रुची बालाजी पाटील चोंडे ना होती एवढेच नव्हे तर त्यांनी गोरगरीब लोकांना देवदर्शन घडविले ज्या गरीब लोकांना मनात इच्छा असूनही तिरुपती सारख्या दूरच्या देवदर्शनाला जाता येत नसल्याने त्यांची इच्छा देखील चोंडेनी पूर्ण केली दरवर्षीच टप्प्याटप्प्याने कितीतरी लोकांना विनामूल्य तिरुपती दर्शन घडविले, एक विशेष बाब म्हणजे सोबत असलेल्या यात्रेकरूंना स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून खाऊ घालणे यामध्ये एक वेगळाच आनंद चोंडे कुटुंबांना वाटायचा ही पवित्र सेवा हे न विसरणारे क्षण आजही लोकांच्या मनात आहे म्हणून श्रीमती अहिल्याबाई यांना मतदान रूपी आशीर्वाद आपण द्यावेत असे कुंटूर सर्कल मधील नागरिकांना वाटते,स्व.बालाजी पाटील चोंडे यांची पत्नी आणि संजय पाटील चोंडे यांची आई श्रीमती अहिल्याबाई बालाजीराव चोंडे यांच्या हाती पूर्वीपासूनच दानत्व आहे गोरगरीब लोकांची सेवा त्यांच्या हातून झालेली आहे शेळगाव छत्रीच्या सरपंच म्हणून त्यांनी यशस्वीरित्या कारभार सांभाळला तर एक सामाजिक वसा सांभाळणारी आदर्श महिला म्हणून परिचित असलेल्या अहिल्याबाई चोंडे ना उमेदवारी द्यावी असे कुंटूर सर्कल मधील जागरूक नागरिकांचे ठाम मत व्यक्त करण्यात येत आहे.