येथून जवळच असलेल्या किनाळा ( बिलोली ) येथे रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवात नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ९ वाजता उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून लगेच साहित्य सम्राट डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती महोत्सव अनुषंगाने अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते , सुप्रसिद्ध साहित्यिक व परखड वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमास अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार गंगाधरराव गंगासागरे , लोकस्वराज्य आंदोलनचे देविदास सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी केले आहे.