Latest Newsनांदेडनायगांव

धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या समर्थनात नायगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर शेळ्या मेंढ्यांचे अनोखे एक दिवसीय धरणे आंदोलन ……

 

रघुनाथ सोनकांबळे नायगाव ….

 

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी 17 सप्टेंबर 2025 पासून जालना येथे आमरण उपोषनास बसले आहेत. त्यांच्या समर्थनात आज नायगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय नायगाव येथे करण्यात आले आहे. सदर आंदोलनात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी चक्क तहसील कार्यालयात शेकडो शेळ्या मेंढ्या आणून धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला. या एक दिवसीय धरणे आंदोलनात प्रमुख मागणी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गाचा अध्यादेश शासनाने तात्काळ काढावा आणि तसे प्रमाणपत्र देण्यात यावे.
20250926 131311
20250926 131311
याच मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने जालना येथे मल्हारयोद्धा दीपक भाऊ बोराडे दि.17 सप्टेंबर 2025 पासून याच मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत .त्या आमरण उपोषणास आज या धरणे आंदोलनातून संपूर्ण नायगाव  तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आल्याचे समाजाच्या वतीने घोषित करण्यात आले.
सदर मागण्यांचे निवेदन नायगाव चे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना धनगर समाजाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, सूर्याजी पाटील चाळकर, संजय पाटील चोंडे, माधवराव चितले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी निवेदनावर सह्या करून सदर निवेदन हे तहसीलदारांना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button