शेकोटीच्या आगीतील ठिणगीने घर पेटले. वीस लाख रुपयाच्या मालमत्तेची झाली राख रांगोळी..
घरासह रोख रक्कम एक लाख 25 हजार, दहा बकऱ्या ,सोळा कोंबड्या, बारा क्विंटल कापूस, संसार उपयोगी साहित्य ,जळून खाक

माहूरप्रतिनिधी दि..(१५)
माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे थंडीचे दिवस असल्याने घराबाहेर थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटविलेली शेकोटी विझवून झोपी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला पडल्याप्रमाणे शेकोटीची ठिणगी हवेद्वारे उडत घरातील कापसावर पडून लागलेले आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य नगदी रक्कम बकऱ्या कोंबड्या सह कापूस जळून खाक झाले असून भूमिहीन असलेल्या योगेश शिरबाजी शेंद्रे यांच्या वीस लाखावर रुपयांच्या मालमत्तेची राखरांगोळी झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आल्याची हृदयद्रावक घटना दिनांक 14 रोजी रात्री एक वाजता घडली आहे
योगेश शेंद्रे हे आपल्या कुटुंबासह टाकळी येथे राहतात भूमिहीन असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती मकत्याने करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते नुकताच कापूस वेचणी करून घरात दहा ते बारा क्विंटल कापूस ठेवलेला होता सोबतच घरात सर्व साहित्य नगदी सव्वा लाख रुपये होते तर दहा बकऱ्या सोळा कोंबड्या सह दोन बैल सुद्धा होते थंडीचे दिवस असल्याने परिवारातील सर्व सदस्यांनी घर बाहेर अंगणात शेकोटी पेटवून रात्री अकरा वाजेपर्यंत बसून होते वेळ झाल्याने सर्वांनी शेकोटी वीजवून सर्वजण झोपी गेले रात्री एक वाजता जोराचा वारा सुरू झाल्याने शेकोटीत अनावधानाने शिल्लक राहिलेल्या आगीतून ठिणग्या उडत घरातील कापसावर पडल्या त्यामुळे कापसाने पेट घेतला वारा जोरात असल्याने सर्वजण उठून बघेपर्यंत पूर्ण कापसासह घरातील अन्य वस्तू लाकूड फाट्याने पेट घेतला होता सुदैवाने सर्वांना बाहेर निघण्याचा वेळ मिळाला अन्यथा मनुष्यहानी झाली असती मध्य रात्र असल्याने सदरील घटना नागरिकांना माहीत होईपर्यंत संपूर्ण घराणे पेट घेतला त्यामध्ये संपूर्ण बारा क्विंटल पेक्षा जास्त असलेला कापूस घरातील सर्व साहित्य सह नगदी सव्वा लाख रुपये गोठ्यात बांधलेल्या दहा बकऱ्या जळून खाक झाल्या 16 कोंबड्या सुद्धा खाक झाल्या दोन बैल आगीत अर्धवट स्थितीत भाजल्या गेले अरडा ओरडा होऊन नागरिकांना माहिती होईपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते नागरिकांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत शेजारील लक्ष्मण शिंदे यांचे घराचे बरेच साहित्य आणि एक बैल सुद्धा अर्धवट जळाला सदरील माहिती तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ तलाठी गावंडे आणि कर्मचाऱ्यासह घटनास्थळाकडे धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले लागलेल्या आगीत शेंद्रे यांच्या वीस लाखावर रुपयांच्या मालमत्तेची राख रांगोळी झाली आहे
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांचे सह मंडळ अधिकारी साळसुनंदर, तलाठी एस. डि. गावंडे, तलाठी, ओमप्रकाश तवर सुनील वणवे पवन यादव गावातील उपसरपंच देवानंद जाधव गणेश भगत सुभाष भावरे चंद्रकांत चोले सुधाकर मुंडे बंडू मुंडे दत्ता फड सुभाष राऊत देवानंद जाधव अण्णा मुरकुटे फय्याज फारुखी त्यांचे सह नागरिकांनी आग विझविण्यासाठी मदत करून सपोनी शिवप्रकाश मुळे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष दांडेगावकर यांचे सह कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला लागलेल्या आगीत शेंद्रे यांचे पूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्याने त्यांना तात्काळ शासकीय मदत द्यावी अशी मागणी होत आहे



