Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

बुद्धांच्या धम्मप्रकाशात एकत्र येऊया” – मरवाळी येथे ३१ मार्च रोजी भव्य बौद्ध धम्म मेळावा व वधू-वर परिचय मेळावा…

रघुनाथ सोनकांबळे..

नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परमपूज्य तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र धम्माच्या साक्षीने भव्य ‘बौद्ध धम्म मेळावा’ व ‘वधू-वर परिचय मेळावा’ मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मंगलमय सोहळ्यात धार्मिक, सामाजिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांची पर्वणी लाभणार आहे.
सकाळी १० वाजता कार्यक्रमाची शुभारंभ ज्येष्ठ उपासक मा. एन. एम. वाघमारे (मरवाळीकर) यांच्या हस्ते धम्मध्वजारोहणाने होईल. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मा. हौसाजी वारघडे यांच्या हस्ते सामूहिक बुद्ध वंदना व पूजापाठ संपन्न होणार आहे.
यावेळी पूज्य भंते शीलरत्न थेरो (संयोग नगर, नांदेड) यांची धम्मदेशना भाविकांना मार्गदर्शन व आत्मिक उन्नतीचा संदेश देईल. या पवित्र सत्राचे अध्यक्षपद माजी जि.प. सदस्य मा. दशरथ लोहबंदे भूषविणार असून, उद्घाटन नायगावचे तहसीलदार मा. डॉ. धम्मप्रिय गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न होईल.
या सोहळ्यास मान्यवर अतिथी म्हणून मा. शेशांत एन. एम., निवृत्ती कांबळे (सांगवीकर), डी. जी. चंदनफुले, मानव कुंडलवाडीकर, डी. आर. शिरसे, पत्रकार गंगाधर धडेकर, आनंद कांबळे (मांजरमकर), अनिल शिरसे, किशन वन्नाळे, मधुकरजी राठोड, केशव पवळे व कैलास वजीरगावकर यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक वाघमारे मांजरमकर करतील, प्रास्ताविक बाळासाहेब धानोरकर मांडतील, तर आभार प्रदर्शन एकनाथ कार्लेकर करतील.
दुपारी २ वाजता द्वितीय सत्रात वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राचे अध्यक्ष खानापूर ग्रामपंचायतीचे सरपंच मा. वाघमारे हे असतील, तर उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंद वाघमारे (मांजरमकर) यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या शेवटी ठराव वाचन होणार असून, अध्यक्षपद दीपस्तंभ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. रमेश वाघमारे (एकलारकर) भूषवतील.
दीपस्तंभ प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून ‘भीम जयंती मंडळ, मरवाळी’ यांच्या वतीने नायगाव तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र धम्म सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button