नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन हद्दीतील देगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कुंटूर पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. पोलिसांनी केलेल्या धाडीत एकूण १३,८०० रुपये रोख, तसेच बॅटरीसह मिळून १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तुरीच्या ओळीमध्ये लपवलेला जुगार अड्डा मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, माणिक प्रभू पेट्रोल पंपाच्या शेजारील शेतातील लिंबाच्या झाडाखाली तुरीच्या ओळीला बॅटरी लाऊन ‘अंदर-बहर’ हा जुगार खेळला जात असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस पथक देगाव शिवारात पाठवून कारवाई केली.
या धाडीत जुगारी तेथे जुगार खेळत असलेल्या पाच व्यक्तींना पोलिसांनी पकडले. त्यात अब्बास रसूल शेख (४६, रा. देगाव) शिवाजी काळबा मोरे (३८, रा. देगाव)बालाजी लक्ष्मण चिंचलवाड (३९, रा. देगाव) माधव बाजीराव कुमनाळे (७०, रा. देगाव) आदींचा समावेश असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी API विशाल पाटील भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल खंदारे करीत आहेत.