Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

वनसंवर्धनासह वन्यजीव संरक्षण काळाची गरज. – तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड.

घुंगराळ्यात वसुंधरा दिन साजरा ; वृक्षारोपन व वन्यजींवासाठी पाणवठ्यात पाणी पुरवठा.

नायगाव तालुका प्रतिनिधी…

पर्यावरणांच्या समस्या दिवसेंदिवस वाढीस असल्याने त्या निवारणासाठी वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षण काळाची गरज असल्याचे मत नायगांवच्या तहसीलदार डाॅ.धम्मप्रिया गायकवाड यांनी व्यक्त केले.
नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे,तेंदू व कॅम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक भिमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय देगलूर (प्रा.) अंतर्गत नियतक्षेत्र मांजरम,मौजे घुंगराळा कक्ष क्रमांक-576 -a याठिकाणी आज जागतिक वसुंधरा दिनी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
Img 20250422 Wa0022
Img 20250422 Wa0022
या कार्यक्रमास तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड यांच्यासह देगलूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे मा.जिल्हा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे, मंडळ अधिकारी आरु, वनपरिमंडळ अधिकारी बालाजी संतवाले,ग्रामपंचायत अधिकारी हनमंत शिंदे,पत्रकार किरण वाघमारे,सहदेव तुरटवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, पेरु,चिकू,मोगरा आदी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली.
भवरे यांनी वन्यप्राण्यासाठींच्या पाणवठ्यात स्वखर्चातून टॅकरद्वारे आणलेले पाणी सोडण्यात आले.
यावेळी बोलतांना वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांनी कार्यक्षेत्रातील कामांची सविस्तर माहिती देतांनाच वसुंधरा दिनाचे महत्व तसेच,वनसंवर्धन तसेच, वन्यजीव रक्षण व यासाठीच्या जनजागृतीसाठी प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तपणे सामोरे येणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.तर,भवरे यांनी मनोगतातून येथिल वनसंवर्धन व वन्यजीव संरक्षण आपली जबाबदारी असल्याचे सांगून आपण स्वतः येथिल तिर्थक्षेत्र, तिर्थस्थळ व निसर्ग पर्यटनाच्या मान्यतेसाठी परिश्रम घेतलेले असले तरिही यासाठी या भागातील व वरिष्ठ आजी- माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील स्थानिक व वरिष्ठांचेही बहुमोल सहकार्य मिळाल्याने प्राप्त निधीतून स्थानिक वनविभागाने दर्जेदार कामे करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पूढे बोलतांना तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड म्हणाल्या की, दिवसेंदिवस वाढत असलेल्या पर्यावरण समस्यांच्या निवारणासाठी प्रत्येक व्यक्तींनी वृक्षारोपन व संगोपनासह वन्यजीव संरक्षणासाठीची जबाबदारी पूर्ण करण्याचे आवाहन केले.प्रारंभी स्थानिक वनविभागाकडून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच,भारतीय संविधान गौरव दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान प्रास्ताविका प्रत भेट लक्ष्मणराव भवरे यांच्यावतिने देण्यात आली.वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपाल बालाजी संतवाले, वनरक्षक गजानन कोतलवार, वनमजूर मधुकर मोरे,बालाजी पांडे,भीमा श्यामा गिरी,विक्रम कळकटवाड,राजू भालेराव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

वनपर्यटन मंजूरी व वन्यजीवांसाठी पुढाकाराचा स्तुत्य उपक्रम ! महत्वाचे म्हणजे वडिलांच्या नोकरीनिमित्ताने घुंगराळ्यात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मा.भवरे यांनी या भागातील वनसंवर्धन, पर्यटन आणि रोजगाराला चालना देण्यासाठी निसर्ग / वनपर्यटनाच्या मान्यतेसाठी घेतलेल्या पाठपुराव्यानंतर त्यातून दर्जेदार कामे तसेच, येथिल वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी सध्याच्या कोरड्या उन्हाळ्यात वनविभागांच्या पाणवठ्यात स्वखर्चातून केलेला टॅकरद्वारे पाणी पुरवठा हा सामाजिक दायित्वातून केलेला उपक्रम स्तुत व कौतुकास्पद असल्याचे यावेळी तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड व वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांनी सांगून आपणही यासाठी सामाजिक बांधिलकीतून सर्वोतोपरी सहकार्य करु असे अभिवचन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button