Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नरसी शहरात रामतीर्थ पोलिसांचे पथसंचलन

रघुनाथ सोनकांबळे……..

 

रामतीर्थ पोलीस ठाणे व एस.आर.पी.च्या वतीने आज दि.३१ जुलै रोजी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अणाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नरसी शहरात पथसंचलन करण्यात आले.

नायगाव तालुक्यातील नरसी येथे दि.१ आॅगसट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणा-या मिरवणुकी निमित्ताने येथील मुख्य चौकातून देगलूर रोड, बिलोली रोड, नायगाव रोड, मुखेड रोडवरुन लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या समाज मंदिर पासून ते मुख्यं बाजारपेठेतून पथसंचलन करण्यात आले. यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि. विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे, एस. आर. पी. चे २५ कर्मचारी, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे २३ अमलदार, १५ होमगार्ड उपस्थित होते.

Img 20250731 Wa0032
Img 20250731 Wa0032

यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि विक्रम हराळे म्हणाले की, लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये तसेच गावात शांततेचा भंग करू नये जर कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे मनाले.

Img 20250731 Wa0033
Img 20250731 Wa0033

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button