जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश दिनांक ७ जुलै रोजी काढले असून यात नायगाव पोस्टेचे गुप्तचर विभागात काम करणारे सोपान वळगे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती केली असल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सोपान वळगे यांची कारकीर्द प्रामाणिकपणाची म्हणून ओळखली जाते. सोपान वळगे हे नायगाव व रामतीर्थ पोलीस स्टेशन च्या हद्दीत जवळजवळ 20 ते 21 वर्ष प्रामाणिक सेवा बजावली आहे.
ते नायगाव पोस्टेला ते 2004 साली रुजू झाले. 2011 पर्यंत नायगाव पोस्टेलाच कार्यरत होते. 2011 ला त्यांची बदली रामतीर्थ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपल्या कामाचा ठसा चांगला उमटविला होता.
यातच त्यांची परत नायगाव पोस्टेला 2017 ला बदली करण्यात आली. तेव्हापासून ते आज पर्यंत नायगाव पोस्टेला कार्यरत आहेत .या त्यांच्या 20 ते 21 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामात कुठलीही कसर केली नसल्याने ते एक चांगले प्रामाणिक पोलीस कर्मचारी म्हणून या परिसरात ओळखले जातात.
वळगे हे रामतीर्थ आणि नायगाव येथे प्रॉपर च्या बीट सांभाळत होते. त्या बीटमध्ये त्यांनी आपली कामगिरी चोक बजावली होती. ते सध्या नायगाव पोस्टमध्ये गुप्तचर विभागात अगदी उत्तम प्रकारे काम पाहत आहेत.
त्यांचा स्वभाव अगदी सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ता, पक्ष, संघटना व त्यांचे पदाधिकारी यांच्यासोबत चांगला राहिला आहे. आज त्यांची वरिष्ठांकडून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने त्यांचे नायगाव ठाण्यांचे पोलीस अधिकारी मारकड व पोलीस कर्मचाऱ्यांकडून व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.