Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
एमपीएससीत घवघवीत यश; आंतरगावकर ज्ञानेश्वर शिंदे यांची PSI पदावर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड..

रघुनाथ सोनकांबळे….
नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील सुपुत्र ज्ञानेश्वर बालाजीराव पाटील शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत PSI पदासाठी नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानशा गावातून मोठे स्वप्न पाहत ज्ञानेश्वर शिंदे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर हे यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. “आमचे छोटे बंधु… नांदेड जिल्हा टॉपर…” अशा गौरवपूर्ण शब्दांत गावकऱ्यांनी त्यांच्या कामगिरीचा सन्मान केला.



