वृक्ष रोपणासारख्या उपक्रमातून पोलीस आणि जनतेतील समन्वय चांगल्या प्रकारे साधल्या जात असल्याचे मत माजी जि.प. सदस्य माणिकराव लोहगावे यांनी व्यक्त केले. नांदेड – हैदराबाद राज्य महामार्गावरील कहाळा टोलजवळ महामार्ग पोलिस केंद्र देगलूरचे पोलीस अधिकारी त्र्यंबक भोस्कर व जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या हस्ते दि.१० ऑगस्ट रोजी रविवारी पोलीस चौकी परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महामार्ग पोलीस केंद्र देगलूरचे पोलीस अधिकारी त्र्यंबक भोस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, पत्रकार सुभाष पेरकेवार, श्यामसुंदर कोकणे, पोलीस कर्मचारी मारोती देवकते,अंगद राऊत, सुनील राठोड, विठ्ठल एडके, राहुल तारू,अब्दुल वाजीद सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.