Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
मुखेड शहरात दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने पळविली ७ लाख ७० हजाराची रोकड…

मुखेड प्रतिनिधी..
मुखेड शहरातील नांदेड मर्चेंट बँकेच्या बाहेर चोरट्याने भरदिवसा दुचाकीची डिक्की काढून त्यातील ७ लाख ७० हजार रुपयांची रक्कम पळविली घटना दि. १८ जून रोजी सकाळी ११: ३० वाजता घडली.
फिर्यादी देवीप्रसाद संभाजी वडजे वय २९ वर्ष रा. अशोक नगर व्यवसाय गोविंद स्टोन क्रेशर वर्ताळा तांडा. ता. मुखेड येथील व्यवस्थापक यांनी सकाळी ११ वाजता मुखेड शहरातील एसबीआय बँकेत जाऊन ७ लाख ७० हजार रुपये उचलले. त्यात १०० व २०० च्या नोटा असल्याने बदलून घेण्यासाठी दुचाकी वाहन क्रमांक एमएच २६ ए एक्स ६७९६ या गाडीवर शहरातील असलेल्या नांदेड मर्चेंट बँकेसमोर गाडी लावून ५०० रुपयांच्या नोटा बदलून मिळेल का ? म्हणून विचारण्यासाठी बँकेत गेले होते.
बँकेतुन परत आल्यावर डिक्कीतील रक्कम नसल्याचे समजले.यावेळी आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ७ लाख ७० हजार रुपयांची पिशवी दोन युवक मोटार सायकलवर येऊन डिक्कीतून पिशवी काढून पळ काढताना दिसत आहेत.



