नांदेड – वंचित,उपेक्षित समुहाच्या शैक्षणिक वस्तूस्थितीवर परखड भाष्य कथाकार मारोती कदम यांनी दमदारपणे केले आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक बापूसाहेब गजभारे यांनी केले . ते ‘ मास्तर आवगो रे ..’ या बालकथा संग्रहावर सप्तरंगी साहित्य मंडळ आयोजित ‘ पुस्तकावर बोलू काही ‘ या विशेष चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते .
ते पुढे असे म्हणाले आज घडीला वंचितांच्या शिक्षणाची दुरावस्था..न परवडणारी खासगी शिकवण्यापासून ते थेट टिईटीपर्यंचा परामर्श घेतला . मास्तर आवगो रे .. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थी मनावर संस्कार करेल असे त्यात वास्तववादी साहित्याचे अविष्कार आहे अशी पाठराखण करून शुभेच्छा दिल्या .५जुलै २०२६ रोज रविवार ..’ विसावा ‘ हॉटेल येथे संपन्न झालेल्या ‘ पुस्तकावर बोलू काही .. पाऊस कविता आणि विद्रोह ‘ या वैविध्यपूर्ण नवोपक्रमाने मारोती कदम यांनी साहित्य रसिकांसाठी नांदेड शहरात नवे दालन उपलब्ध करून दिले .
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिसूर्य महात्मा फुले , विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .याप्रसंगी भाष्यकार प्रा . गोविंद बैलके , बालाजी थोटवे डॉ . संतोष सेलूकर, सुरेखा महादसवाड यांनी देखिल अभ्यासूपपूर्ण कथासंग्रहाचे अंतरंग आणि बहिरंग उलगडून दाखवले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथालेखक मारोती कदम , सूत्रसंचालन समीक्षक प्रज्ञाधर ढवळे , आभार सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अनुरत्न वाघमारे यांनी मानले .
कार्यक्रमास सप्तरंगी साहित्य मंडळाचे पदाधिकारी नागोराव डोंगरे , उपसंपादक सुनील बेंद्रीकर ,शंकर गच्चे , चंद्रकांत कदम यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खंडेराव सर्जे , प्रकाश पवार , उमाकांत शिवशेटे, धमपूरी यन्नावार, राजेश्वर कोलंबरे , शंकर कुरतापल्ले , मारोती पोरडवार , साहेबराव कोंडावार ,फय्याज शेख ,. स्मिता ठक्कुरवार, सचिन तुंगेनवार आदींनी प्रयत्न केले .