Latest Newsआपला जिल्हानांदेड
२३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा! वंचित बहुजन आघाडी, नांदेड जि.

रघुनाथ सोनकांबळे……
दिल्ली येथे शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज आणि बळाचा वापर हा अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये आपल्या न्याय्य मागण्या मांडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने दिला आहे. अशा शांततापूर्ण आंदोलनांना दडपण्यासाठी शासनाकडून बळाचा वापर करणे ही लोकशाहीच्या मूल्यांवर झालेली गंभीर गदा आहे.
– *या घटनेचा वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत.*
– *या निषेधार्थ मा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दि. २३ जुलै २०२६ रोजीच्या महाराष्ट्र बंदला वंचित बहुजन आघाडी, नांदेडचा संपूर्ण पाठिंबा आहे*
– या महाराष्ट्र बंदमध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, एस.टी. कर्मचारी, ऑटो रिक्षा युनियन, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्व न्यायप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
–
महत्त्वाची सूचना *तातडीची समन्वय बैठक*
दि. *२२ जुलै २०२६ (बुधवार)*
वेळ : *सकाळी ११:०० वाजता*
स्थळ : *शासकीय विश्रामगृह, नांदेड*
महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटना, व्यापारी संघटना व इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे.
*महाराष्ट्र बंद – नांदेड*
दि. *२३ जुलै २०२६ (गुरुवार)*
वेळ : *सकाळी १०:०० वाजता*
सर्वजण एकत्रित जमण्याचे ठिकाण : *महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर, नांदेड*



