
रघुनाथ सोनकांबळे ..दि..(१९)
**************************
शाळा हे उत्तम विचाराचे विचारपीठ आहे. या विचारपपीठातून अनेक गुणवान विद्यार्थी घडत असतात आणि असे गुणवान विद्यार्थी हे शाळेचे गावाचे आणि इथल्या मराठी मातीचे वैभव असतात.ही मोठे होण्यासाठी शिक्षकांबरोबर गुणवंत विद्यार्थीही असणे आवश्यक आहे त्यामुळे शाळेचे नाव, गावाचे नाव,सर्वत्र नावारूपाला येतात. त्यामुळे शिक्षक हे महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन *प्रख्यात साहित्यिक कथा कवी बालाजी पेटेकर खतगावकर* यांनी केले.
.ते *कुन्मारपल्ली* ता.देगलूर जिल्हा नांदेड या कर्नाटकच्या सीमेवरील वरील गावातील *शांती वर्धक हायस्कूल कुन्मारपल्ली* येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून *बालाजी पेटेकर खतगावकर* बोलत होते.
. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पवार पी.के. सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक वड्डे एम. व्ही. होते.
यावेळी *स्नेहा शिंदे, सविता म्हेत्रे,संजना म्हेत्रे,शाहू बिरादार,वैशाली शेरीकर,अर्चना राठोड, वेदिका धर्मवाड, अंकिता डोंगरे* इत्यादी जणांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर बालाजी पेटेकर सर यांनी विविध कवितांनी मुलांना मनमुराद आनंद दिला. त्याच बरोबर त्यांची *काजळमया* ही कथा सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना खूप हसवले आणि शेवटी अंतर्मुख व्हायला भाग पाडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण एस.टी.सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कलाध्यापक सुंकेवार बालाजी सर यांनी मांडले. यावेळी अर्चना गंदिगुडे, हलबुर्गे श्रावणी, भाईदोडे, मुकपोगले सुमन, पवार इशाका, धर्मवाड शाहूबाई, जोळदापके प्रतीक्षा, बासे शाहू, वेदांती केरे, संध्याराणी शेरीकर, राजश्री म्हेत्रे, बिरादार अंजली,डोंगरे रेवती, कांबळे आखिला, पाटील लिंगराज, काळे आशिष, गंगाजी रेणुका, गंगाजी अंजली, बालूरे दीपिका, गनिमे शुभांगी,म्हेत्रे संध्या, जडगे शुभांगी, अपाने सिंधू, डोंगाले साक्षी, शिंदे रेणुका, मसूरे पौर्णिमा, पाटील श्रीकांत, आर्या सरपंच, संतोष इबितवार, उमाकांत बंडे, गंगाजी युवराज इतर अनेक विद्यार्थी, गावातील पालक उपस्थित होते.



