Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
कृष्णूर गणातून वंचित बहुजन आघाडी कडून दिपक गजभारे घुंगराळेकर इच्छुक!

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव ….
सध्या राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यात नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कल देखील चर्चेत आले असून, या सर्कलमध्ये कृष्णूर गण एस.सी. (पुरुष) प्रवर्गासाठी आरक्षित ठरला आहे.
या गणातून वंचित बहुजन आघाडीचे युवा दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष दिपक गजभारे घुंगराळेकर यांनी इच्छुक म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गजभारे यांचा या गणात चांगला प्रभाव असून, सामाजिक कार्यात ते नेहमी पुढाकार घेतात. अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात राहून पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक कामात दिपक गजभारे यांचा सातत्यपूर्ण सहभाग असल्याने, त्यांना तिकीट दिल्यास वंचित बहुजन आघाडीला निश्चित फायदा होईल, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
बरबडा सर्कलमध्ये गेल्या काही निवडणुकांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रंगतदार लढती झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी या समीकरणात नवी दिशा देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्कलमधील दोन्ही गणांमध्ये तगडे उमेदवार उभे राहणार असल्याने चुरशीची लढत निश्चित दिसते आहे. “वंचित धनशक्ती विरुद्ध जनशक्ती” असा सामना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपले खाते नायगाव तालुक्यात उघडते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवार म्हणून दिपक गजभारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असून, जनतेतून त्यांना तिकीट देण्याची मागणी होत आहे.
—
आरक्षण आणि राजकीय समीकरणे …..सध्या राज्यात मराठा आरक्षण हा वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, हे येणारा काळ ठरवेल.
दुसरीकडे, ओबीसी आरक्षण प्रश्न देखील गाजत असून, “मराठा उमेदवारांना मतदान करायचे नाही” अशी भूमिका काही ओबीसी नेत्यांनी जाहीरपणे घेतली आहे. या घडामोडींचा स्थानिक निवडणुकांवर परिणाम होईल का, असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांच्या मनात निर्माण झाला आहे.
—
नायगाव तालुका परिसरात वंचित बहुजन आघाडीची वाढती ताकद आणि दिपक गजभारे यांची सक्रियता या निवडणुकीत नवा राजकीय रंग भरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



