Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन नरसीतील अंगणवाडीत उत्साहात साजरा — बालकांच्या मनावर ‘जयभीम’ संस्कारांची पेरणी

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव….
नरसी (प्रतिनिधी): नरसी येथील अंगणवाडी क्रमांक १ मध्ये अंगणवाडी सेविका कमलबाई मरीबा गवाले यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने २०१७ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अंगणवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी सेविका कमलबाई गवाले यांनी बालकांना बाबासाहेबांच्या शिक्षणप्रेमाची प्रेरणादायी गाथा, समाजातील त्यांच्या कार्याची महती तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाचे महत्व भावपूर्ण शब्दांत सांगितले.
बालवयातच बाबासाहेबांचे विचार बालकांच्या मनात रुजावेत या हेतूने गवाले यांनी दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबवला असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे नरसीतील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले आहे.



