Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांनी रायगड  किल्ल्याच्या पायथ्याशी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे.

*नायगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ बांधव, शेतकरी, मजदूर, सह बांधवांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी होत असलेल्या आंदोलनास लाखोच्या संख्येने सहभागी व्हावेत*..*गजानन  चव्हाण

रघुनाथ सोनकांबळे …..

 

महाराष्ट्रातील जनतेच्या न्याय हक्कासाठी हुरहुरीने आवाज उठवणारे प्रहार प्रमुख तथा दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राज्यमाता मां जिजाऊ समाधी पाचाड स्थळ जवळ दिनांक 21 /22 व 23 मार्च रोजी तीन दिवसीय आंदोलन होणार आहे या आंदोलनात दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ बांधव शेतकरी कष्टकरी मजदूर बांधव यांच्यासह प्रमुख मागण्या आहेत. दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिक यांना 6000 रुपये प्रति महिना मिळावेत वघरकुल प्राध्यान्याने,तसेच राजकीय आरक्षण, मिळावे.
या प्रमुख मागण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो दिव्यांग सह अमरण उपोषण करणार तसेच अपंग निराधार वय वृद्ध बांधव हे शारीरिक दृष्ट्या कमकुवत असल्यानेही या बाबीची जाण असताना देखील आपल्या जीवाची प्रवाह न करता रक्तदान करून आंदोलन करण्याची भावना आज महाराष्ट्रातील सर्व बांधवांची झालेली आहे.हे लक्षवेधीय आंदोलन या प्रमुख मागण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील होते दिव्यांग ,निराधार ,ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, बांधव आमरण उपोषण करणार आहेत.
या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन हे महायुती सरकार सत्तेवर आले आहे. त्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी अख्ख्या जगाला प्रसिद्धी असलेली या किल्ले रायगडा पायथ्याशी आंदोलन केले जाणार आहे. नायगाव मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ, बांधव, शेतकरी ,कष्टकरी ,मजदूर बांधव ,या सह जनतेनी आपण या समाजाचे देणे लागते अशा विचारधारेच्या सर्व बांधवांनी या आंदोलनात लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते गजानन  पाटील चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button