Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
ग्रामीण भागातील सामाजिक कार्याची दखल; दिलीप सोंडारे यांना ‘आदर्श सेवा सन्मान’ राज्यस्तरीय पुरस्कार

रघुनाथ सोनकांबळे……..
सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत समता दूत म्हणून कार्यरत असलेले दिलीप सोंडारे यांना दैनिक तुफान क्रांतीच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श सेवा सन्मान’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील पंचायत समिती सभागृहात दि. ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या सभारंभात दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर व निवड समितीच्या हस्ते सोंडारे यांना सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागात सामाजिक समता, जनजागृती आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. समता दूत म्हणून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
बार्टीच्या महासंचालिका दीपा मुधोळ-मुंढे, निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच सहाय्यक समता कल्याण आयुक्त शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे आणि प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोंडारे यांनी विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत.



