Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

अज्ञात वाहणाची ऑटोला धडक, दोघांचा मृत्यू एकाची प्रकृती गंभीर नांदेड येथे उपचार सुरु.

 

कुंटूर प्रतिनिधी….दि(.१५)
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुंटूर फाटा येथील नांदेड हैद्राबाद महामार्गांवर कुंटूर पोलीस स्टेशनंच्या हद्दीत पंचवटी हॉटेल जवळील वळणावर 14 डिसेंबरच्या रात्री अंदाजे दहा ते अकरा l देगलूरकडून नांदेडला जाणाऱ्या ऍटोला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमीला नांदेड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आली असल्याची माहिती ईश्वरी पोलीस कॉन्स्टेबल कुंटूर पोलिसांनी दिली.
कुंटूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 डिसेंबरच्या रात्री 11 च्या दरम्यान अपघात झाला. कुंटूर पाटीजवळ, पंचवटी हॉटेल समोर देगलूरकडून नांदेडकडे येणारा ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.8036 यास कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिली आणि तो पळून गेला. अपघात झालेल्या ऍटोतील दोन जण जागेवरच मरण पावले तर एक जखमी अवस्थेत होता. महामार्ग सुरक्षा पथकातील जवानांनी जखमी असलेल्या अफसर खान बन्ने खान (38) रा. खडकपुरा नांदेड यास त्वरीत उपचारासाठी नांदेड येथील दवाखान्यात पाठविले.
या अपघातात दोन व्यक्तींचा जागेवरच मृत्यू झाला त्यात एजाज खान बन्ने खान (42) रा. खडकपुरा नांदेड आणि मोहम्मद अफसर रा. बान्सवाडा जि. निजामाबाद (तेलंगणा) अशी अशी मयताची नावे आहेत. अपघात झालेल्या ऍटोमधील नागरिक हे आठवडी बाजारात फिरून आपला व्यवसाय करत होते. काल देगलूर येथील आठवडी बाजार करून आपला व्यवसाय करून नांदेड कडे येत असताना या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या अपघातात दोन भाऊ होते. जागेवर मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून दवाखाण्यात उपचार घेत आहे.या अपघातात अद्याप गुन्हा दाखल झाला नसून पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीस ठाणे कुंटूर येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक खोले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट प्रमुख खंदारे व पोलीस कॉन्स्टेब विवेक ईश्वरी हे करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button