वाळु चोरून नेनारे तेरा वाहने नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी जीव धोक्यात घालून यांनी पकडली ..
माहूर तालुक्यात वाळु चोरमारे विना नंबरचे ट्रॅक्टर व टिप्परांचा धुमाकूळ.. पोलिसासह आरटीओचे दुर्लक्ष....

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी…दि..( २३)
माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदी नदीपत्राला लागून वाळू चोरणासाठी अधिकृत नऊ वाळू घाट असताना वाळू माफिया शेतकऱ्यांना रकमा देऊन अनेक रस्ते बनवुन अर्ध्या रात्री नंतर चोरी करण्याचा सपाटा लावला आहे
महाकाल नावाने प्रसिद्ध झालेले नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी वडसा सायफळ लांजी नेर नदी पत्रावरील रस्ते खोदून टाकल्याने येथील वाळू चोरी जवळपास संपुष्टात आणली आहे.
तरी पण साकुर, हिंगणी ,कु दींगडी, या परिसरात विदर्भातील चोरटे वाळू चोरी करत असल्याची माहिती नायब तहसीलदार यांना मिळाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तसेच तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार यांनी दि 21 रोजी अर्ध्या रात्री दबा धरून बसत हिंगणी फाट्या जवळ वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून जीव धोक्यात घालत वाळु चोरून नेनारा ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात आणुन लावल्याची घटना पहाटेच्या 5 वाजता घडली आहे.

सदर घटनेचा पुर्ण व्रतात असा आहे की. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाकाल उर्फ नायब तहसीलदार कैलास जेठे हे रात्रभर गस्त घालत असून खबऱ्यामार्फत खबर मिळाल्याने केरोळी फाटा हिंगणी फाटा ईवळेश्वर ते कुपटी या रस्त्यावर हिंगणी फाटा येथे सकाळी चार वाजता सापळा रचला तितक्यात एक निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा लाल रंगाची ट्राली असलेल्या ट्रॅक्टर वाळू भरून वन विभागाच्या हद्दीत जंगलातील झाडीत लपवून ठेवलेला दिसला तेथे उभा असलेल्या चालक गणेश नथू पतंगे याची चौकशी केली असता विना नंबर प्लेट असलेल्या ट्रॅक्टर मधून वाळू चोरी करून नेत असल्याचे कबूल केल्याने ट्रॅक्टरचा तिथेच नागरिकांना बोलावून पंचनामा करण्यात आला त्यात त्याने ट्रॅक्टर क्रमांक एम एच 26 सी इ 7596 असल्याचे सांगितले त्यामूळे ट्रॅक्टर. तहसील कार्यालय माहूर येथे आणून जप्त करण्यात आला. पंचनाम्यावर नंदकिशोर नथू पतंगे संदीप नथू पतंगे अमोल नथू पतंगे यांचे सह निलेश मनोज जयस्वाल मधु वामन जाधव संदीप मारुती रणमले सागर दत्तात्रय हिवाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
माहूर तहसीलचे कर्तबगार नायब तहसीलदार कैलास जेठे उर्फ महाकाल यांनी आतापर्यंत एक पोकलेन एक जेसीबी तीन टिप्पर आणि आठ ट्रॅक्टर पकडल्याने वाळू तस्करांचा जीव भांड्यात पडला असून माहूर तालुक्यात वाळू चोरी करण्यासाठी विना नंबरचे ट्रॅक्टर टिप्पर धुमाकूळ घालत असून पोलिसासह आर टी ओ चे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा कोट्यावधीचा महसूल चोरी होत असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्काळ लक्ष घालत वाळू तस्करांशी दोन हात करण्यासाठी माहूर तहसील कार्यालयाला अग्निशास्त्र सह आणखी एक नवीन वाहन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे



