Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

कूंटूर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस: डोंगरगाव गावात वीज यंत्रणा कोलमडून मोठे नुकसान,जनजीवन विस्कळित

 

सिध्दार्थ गजभारे कुटुंर..

 

कूंटूर परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे वीज वितरण यंत्रणा विस्कळीत झाली. पावसाने कूंटूर परिसरातील अनेक भागांत मोठे नुकसान झाले.

डोंगरगाव येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने गावातील काही लोकांच्या घरावरील पत्रे उडाले ,वीज खांब आणि वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला.तर शिवराज जाधव नामक व्यक्तीचा पाय वीज पडून भाजला असल्याचे तेथील नागरिकांनी म्हटले आहे.

कूंटूर परिसरात काही ठिकाणी वीज तारा तुटल्या तर वीज खांब वाकडे झाले. या वादळाचा सर्वाधिक फटका डोंगरगाव येथील नागरिकांना बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button