Latest Newsआपला जिल्हानांदेडमुखेड
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा च्या अनुषंगाने मुखेड येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न.
९ ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चास मुखेड तालुक्यातील हजारो एस.सी.बांधव सहभागी होण्याचा निर्धार

रघुनाथ सोनकांबळे………
नांदेड येथे ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा च्या अनुषंगाने मुखेड शासकीय विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठक दि.२६ जुलै रोजी पार पडली.
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी प्रस्तावाबाबत या बैठकीदरम्यान तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या ९ ऑगस्ट रोजी च्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्च्याच्या संदर्भाने पुढील मोर्चाची दिशा, नियोजन बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीने नांदेड येथील आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात तालुक्यातील हजारो बांधव,युवक,युवती,महिला भगिनी सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीचे अध्यक्ष इंजि.भीमराव धनजकर,तर प्रमुख मार्गदर्शक – प्रा.राजू सोनसळे, इंजि.अशोक गायकवाड,राहुल चिखलीकर,कुलदीप राक्षसमारे (नगरसेवक म.न.पा नांदेड),अतिश ढगे, केशव कांबळे (मातंग समाज नेते,नांदेड) संकेत सोनकांबळे, इत्यादी.ही बैठक मा.अनिल सिरसे (जिल्हाध्यक्ष,रिपब्लिकन सेना नांदेड), आकाश कांबळे बेळीकर, (भीमशक्ती तालुकाध्यक्ष मुखेड) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या बैठकीला प्रमुख उपस्थितीत गंगाधर सोंडारे (जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा), इंजि.राजेंद्र वाघमारे,अविनाश कांबळे (तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा,मुखेड),तुकाराम गायकवाड (वंचित बहुजन आघाडीचे नेते, जांब), पवन कांबळे येवतीकर (जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड),
जयभीम सोनकांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्ष),विजय लोहबंदे (राज्य उपाध्यक्ष एस एफ आय),डॉ.राहुल कांबळे (पशुचिकित्सक संघटना राज्य अध्यक्ष),आशिष भारदे (आझाद समाज पार्टी),दिलीप भद्रे (जिल्हा सचिव रिपब्लिकन सेना नांदेड),सिद्धार्थ कांबळे बेळीकर (उपसरपंच प्र.तथा युवा व्याख्याते),सतीश कांबळे बावलगावकर,
अण्णासाहेब जाहिरे (होलार समाज नेते),गजानन जमदाडे (चर्मकार समाज नेते), देविदास वाघमारे (मातंग समाज कार्यकर्ते),केतन भेदेकर (वंचित बहुजन आघाडी महासचिव मुखेड),प्रा.अरविंद येवतीकर,आशितोष कांबळे,राजू वाघमारे,अनिल बनसोडे,नागसेन लोहाळे,अतिराज कांबळे,बालाजी सोनकांबळे केरुरकर,कमलाकर घोडके (माजी सरपंच बोमनाळी), के.एस.गायकवाड (चांडोळा), ॲड.रणजीत जामखेडकर, संघशिल भद्रे,सचिन गायकवाड (जांब),कुलदीप बनसोडे (सरचिटणीस भा.बौ.म.), सचिन माहेगावकर,ॲड.बालाजी टिकनरे,डॉ.राजकुमार जोंधळे,संघपाल भेंडेगावकर,पप्पू सोनकांबळे,अंकुश वाघमारे, अजित शिनगारपुतळे इत्यादींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.




