मी संत गाडगेबाबा बोलतो एक पात्री प्रयोग ……………………..
पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर देगाव येथे मी संत गाडगेबाबा बोलतो या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण

नायगांव
पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर देगाव येथे मी संत गाडगेबाबा बोलतो या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण अतिशय सुंदर व मनाला भावेल असे डेब्बू यांचे विचार व यांची भूमिका बोलकी होती . मुले मंत्रमुग्ध झाले होते . या कार्यक्रमासाठी वर्ग ६वी वर्गाची कथामाला प्रमूख आराध्या मोरे व प्रमूख अतिथी डेबूजीच्या भूमीकेत सुधाकर कदम या कलाकाराने संत गाडगेबाबा यांचा जीवन पट विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष गाडगेबाबा यांच्या भजनाने सुरुवात झाली गोपाला, गोपाला देवक नंदन गोपाला ….. गाडगेबाबा दिवसा गाव स्वच्छ करायचे रात्री किर्तन करून समाजात अंधश्रध्दा कशी दिवसागनिक वाढत चाली यांच दुःख बाबांना होत होते . म्हणून ते म्हणायचे कर्ज काढून सण करू नका . मुक्या प्राण्यांचा बळी घेऊ नका . कर्ज काढून तीर्थयात्रा करु नका गाव तिथे स्वच्छता मोहिम मोठया प्रमाणात राबवली .
प्रत्येकांनी ह्या प्रबोधन चळवळ मध्येभाग घेतला .याप्रसंगी एल .डी. कोडांवार , मलन्ना कडलवार , उमाकांत धुळेकर , गंगाधर बेळगे, पिराजी शहापूरे, रमेश शिंदे , बालाजी नागठाणे, सौ . जाधव मॅडम , मोरे मॅडम , चिंचलवाड मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते .



