जारिकोट येथे ४ वर्षापासुन भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे आयोजन
पंचशील ध्वजारोहन जेष्ठ पत्रकार गंगाधर धडेकर यांच्या हस्ते होणार

धर्माबाद प्रतिनिधी.दि.(३०)
धर्माबाद :- धर्माबाद तालुक्यातील जारिकोट येथे दरवर्षी १ जानेवारी ला सतत ३वर्षा पासुन भीमा कोरेगाव शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याही वर्षी१जानेवारी२०२५ ला ही भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
कार्यक्रम हा तिनं सत्रामध्ये होणार आहे सकाळी प्रथम सत्रात बुद्ध वंदना पुजा पाठ,सुभाष कांबळे सर,सदानंद देवके भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते तर धर्माबाद भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष पत्रकार गंगाधर धडेकर यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

, दुसऱ्या सत्रात दुपारी १० ते १६ वयोगटातील मुला मुलींचा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे .तर तिसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका दिपाली कांबळे व त्यांचा संच लातुर,व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिक बबन दिपके व त्यांचा वसमत यांना भीम गीतांचा जंगी सामना होणार आहे.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष .एम. सायलू दादा म्हैसेकर (संस्थापक, एस्सी फॉर एस्सीज राईट्स) कार्यक्रमाचे उद्घाटक . जे.के. जोंधळे सल्लागार, वंचित बहुजन आघाडी, प्रमुख पाहुणे म्हणून . मोईज सेठ करखेलीकर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती ,. बाळासाहेब रोकडे (पोलिस निरीक्षक, धर्माबाद),.जी.पी. मिसाळे भारतीय बौद्ध जिल्हा उपाध्यक्ष, मा.गंगाधर वाघमारे सरांना राष्ट्रपती पुरस्कार, पुंडलिक कांबळे (वरिष्ठ तंत्र सहायक) . शंकरराव वाघमारे बन्नाळीकर, . भगवान कांबळे तालुकाध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार समिती .गणेश वाघमारे पत्रकार, समता सैनिक दल तालुका प्रमुख किरण सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते माधव वाघमारे, मा. गंगाधर लव्हाळे, बंद ळचंदर मिसाळे विगृह अधीक्षक मिलिंद सोनकांबळे भीम आर्मीसंदिप मस्के,. प्रफुल्ल टाकळीकर,. संजय निवडंगे . सुदर्शन वाघमारे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष. निवृत्ती पहेलवान . क्रांतीकुमार बुद्धेवार ,. सचिन भद्रे,. एकनाथ जिंकले अध्यक्ष, गौतम देवके कुलदीप मस्के
बुद्धिवंत लोखंडे . माधव वाघमारे कांगठीकर . गोविंद गंगाधरराव रामोड ,.गणेश जाबुवंतराव धुष्पे,प्रा. रविंद्र विठ्ठलराव मुपडे यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
तरी धर्माबाद शहरातील व तालुक्यातील भिम अनुयायी बौद्ध उपासक उपसिका बालक बालिका यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भिमा कोरेगाव सम्राट भीम जयंती मंडळ जारिकोट च्या वतीने करण्यात आले आहे.



